Malaika Arora & Arjun Kapoor Brutally Trolled For Recent Airport Spotting Google
मनोरंजन

Malaika आणि अर्जुन मध्ये बिनसलं? व्हायरल व्हिडीओनं रंगली चर्चा

बी-टाऊनचे लव्ह बर्ड्स म्हणून मलायका -अर्जुन कपूर ही जोडी सगळ्यांचीच फेव्हरेट आहे,पण एअरपोर्टचा व्हिडीओ पाहून भलतीच चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

सध्या बी-टाऊनचे लव्ह बर्ड्स म्हणून मलायका(Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor)जोडी सगळ्यांचीच फेव्हरेट आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांचं नेहमीच मन जिंकण्यात यशस्वी ठरते. अनेक ठिकाणी ते जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी ते सोडत नाही. पण यावेळी मात्र कपलला पाहिल्यावर असं वाटत आहे की यांच्यात काहीतरी बिनसलं आहे. (Malaika Arora & Arjun Kapoor Brutally Trolled For Recent Airport Spotting)

मलायका-अर्जुन कुठल्याही फंक्शनमध्ये एकत्र दिसले की नेहमीच एकमेकांचा हात हातात धरुन एकत्र दिसतात. एअरपोर्टला देखील दोघं पापाराझीला एकत्र पोझ देताना दिसतात. पण नुकत्याच एका कार्यक्रमात दोघं एकमेकांपासून लांब वावरताना दिसले.

मलायका-अर्जुनमध्ये अचानक आलेली ही दूरी चाहत्यांना मात्र नाराज करुन गेली आहे. एअरपोर्टवरचा कपलचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकाल मलायका आणि अर्जुन जे नेहमीच एकमेकांचा हात हातात घेऊन चालताना दिसतात,ते आता एकमेकांना टाळत चालताना दिसले, आणि दोघांचा मूडही सिरीयस दिसला.

मलायका-अर्जूनच्या या अशा वागणुकीमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मात्र वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये दोघांवर नुसता प्रश्नांचा भडिमार करताना दिसत आहेत. एकाने लिहिलं आहे,'असं वाटतंय दोघांचं विमानात भांडण झालं आहे'. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे, 'काहीतरी गडबड आहे. नक्कीच भांडण झालं आहे'.

मलायका आणि अर्जुन काही दिवसांपूर्वीच मनिष मल्होत्राच्या फॅशन शो मध्ये एकत्र दिसले होते. तेव्हा अर्जुन कपूर रॅम्पवर होता तर मलायका त्याला चिअर करताना दिसली. अर्जुननेही मलायकाला पाहिल्यावर तिला फ्लाइंग किस देत खुश करताना सगळ्यांनी पाहिलं. पण त्यानंतरचा हा नवा व्हिडीओ मात्र दोघांमध्ये बिनसल्याची मोठी बातमी देत आहे.

असो, दोघांच्या चाहत्यांची मात्र मनापासून इच्छा आहे, नात्यात ऑल इज वेल असो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT