Malaika Arora Bollywood actress celerity Mumbai  esakal
मनोरंजन

Malaika Arora : 'अय जरा दमानं...!' विमानतळावर जे घडलं त्यावरुन मलायका चाहत्यावर चिडली

आता विमानतळावर जे काही घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Malaika Arora bollywood actress celebirty mumbai airport : मलायकाच्या बाबत कधी काय होईल हे सांगता येत नाही. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्तवेळ सोशलमीडियावर चर्चेत राहणारी ती सेलिब्रेटी आहे. भलेही मलायका कोणत्या चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच स्टार राहिली आहे.

मलायकाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मलायकानं तिची चाळीशी केव्हाच पार केली आहे. पण तिच्या सौंदर्यात तिचं वय कधीच आड येत नाही. हे तिच्या बोल्ड फोटोंकडे पाहिल्यावर आणि त्याला चाहत्यांनी दिलेल्या कमेंटसवरुन दिसून येते. मलायकाचा एक दिवस असा जात नसेल की ती कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत नाही... आताही तिच्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

पापाराझ्झी हे नेहमीच मलायकाचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकदा मलायकाचा संताप होत असतो. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या आयुष्यावर आधारित मुव्हिंग विथ मलायकाचा नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्यामध्ये मलायकानं पापाराझ्झी आणि तिच्याबाबत होणारं ट्रोलिंग याविषयी सांगितलं होतं. आता विमानतळावर जे काही घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

गुरुवारी सकाळच्या सुमारास मलायका मुंबई विमानतळावर आली. त्यानंतर तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्यातील अनेकांना मलायकासोबत फोटो काढायचा होता. मात्र त्याला मलायकानं हरकत घेतली. याचवेळी तिच्या काही चाहत्यांचा ग्रुप फोटो काढण्यासाठी गेला. त्यांच्यात थोडी धक्काबुक्की झाली.आणि मलायकानं चाहत्यांना जरा संयमानं वागण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या त्या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

आराम से...असं म्हणतात तिनं चाहत्यांना शिस्तीत वागण्याचा सल्ला दिला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यावर दिलेल्या नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट भन्नाट आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाचीही चर्चा रंगली आहे. ते येत्या वर्षी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT