Malaika Arora Boyfriend arjun Kapoor and ex-husband arbaaz khan will part in arora sisters web show Google
मनोरंजन

असं पहिल्यांदाच घडणार जिथे अर्जुन,मलायका,अरबाज एकत्र येणार,'अरोरा सिस्टर्स' ची चर्चा

'अरोरा सिस्टर्स' या शो मध्ये खूप चटपटीत गॉसिप्स ऐकायला मिळणार असल्यानं बी-टाऊनच नाही, चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता पहायला मिळते आहे.

प्रणाली मोरे

Arora Sisters: मलायका अरोरा आणि तिची बहिण अमृता अरोरा एक वेब शो घेऊन येत आहेत,ज्याचं नाव आहे 'अरोरा सिस्टर्स'. या शो मध्ये खूप चटपटीत गॉसिप्स ऐकायला मिळणार यात शंकाच नाही. शो विषयी एक नवी अपडेट आता समोर येतेय कि यात मलायकाचा पूर्वाश्रमीचा नवरा अरबाज खान आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूर एकत्र येऊ शकतात. असं पहिल्यांदाच होईल,जेव्हा दोघं एकत्र दिसतील. आता या शो विषयी आणखी एक दावा केला जात आहे. चला जाणून घेऊया याविषयी.

एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार 'अरोरा सिस्टर्स' शो मध्ये मलायका अरोराचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहेत. अर्थात असं देखील बोललं जात आहे की दोघं वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत,एकत्र नाही.(Malaika Arora Boyfriend arjun Kapoor and ex-husband arbaaz khan will part in arora sisters web show)

माहितीनुसार,'अरोरा सिस्टर्स' वेब शो मध्ये मलायका आणि अमृता यांचे प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ दाखवलं जाणार आहे. दोघी बहिणी सोशल मीडियावर भलत्याच सक्रिय पहायला मिळतात आणि नेहमीच चर्चेत असतात. एक ट्विस्ट यात असा आहे की या शो मध्ये दोघींचे जवळचे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सही सामिल होण्याची शक्यता आहे. आता हे तर जगजाहीर आहे की मलायका आणि अमृता यांचे बी-टाऊन मध्ये ढीगभर फ्रेंड्स आहेत. जसं करिना कपूर, करिश्मा कपूर...आणि इतरही बरेच. त्यामुळे शो मध्ये बड्या हस्ती सामिल होणार यात शंकाच नाही.

दोघींच्या कामाविषयी बोलायचं झालं तर मलायका अरोराने कितीतरी हिट डान्स नंबर बॉलीवूडला दिले आहेत. यामध्ये 'छैय्या छैय्या','रंगीलो मारो ढोलना', 'मुन्नी बदनाम हुई' अशा गाण्यांचा समावेश आहे. तर तिची बहिण अमृता अरोरा विषयी बोलायचं झालं तर 'आवारा पागल दिवाना' आणि 'कम्बख्त इश्क' सारख्या सिनेमांत ती दिसली होती.

अर्जुन कपूर विषयी बोलायचं झालं तर काही दिवस आधी तो आपली चुलत बहिण सोनम कपूरसोबत करणच्या 'कॉफी विथ करण ७' या चॅट शो मध्ये दिसला होता. त्यावेळी त्यानं मलायका सोबतच्या नात्यावर मोकळेपणाने संवाद साधला होता.

तर अरबाजविषयी बोलायचं झालं तर त्याचं नाव सध्या जॉर्जिया एंड्रियानी सोबत जोडलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT