Malaika Arora
Malaika Arora sakal
मनोरंजन

Malaika Arora: मलायकाचा 'तो' व्हिडिओ होतोय भलताच व्हायरल कारण...एकदा पहाच

Aishwarya Musale

बॉलीवूडची आयटम क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर नेहमीच अपडेट राहणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील सर्व माहिती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलीकडेच, अभिनेत्रीने प्रसिद्ध द बॅकस्ट्रीट बॉईजच्या मुंबई कॉन्सर्टला हजेरी लावली आणि खूप आनंद घेतला. ती तिच्या फ्रेंड सर्कलसोबत इथे पोहोचली होती. अभिनेत्रीने या काळातील झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मलायका अरोरा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिचे वय जवळपास 50 आहे पण तरीही ती तिच्या फिटनेसने लोकांना मात देते. अभिनेत्रीला तिच्या आयुष्याचा पुरेपूर आनंद कसा घ्यावा हे माहित आहे. तसे, तिचे दैनंदिन वेळापत्रक बरेच कडक आहे.

ती तिच्या दिवसाची सुरुवात योगाने करते. पण याशिवाय अभिनेत्री तिच्या मोकळ्या वेळेत मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसते. अलीकडे, तिने तिच्या एका कॉन्सर्टचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पूर्ण मजा करताना आणि 20 वर्षाच्या मुलीप्रमाणे नाचताना दिसत आहे.

यादरम्यान ती ब्लॅक कलरच्या मिनी ड्रेसमध्ये असून ती खूपच डॅशिंग दिसत आहे. अभिनेत्री व्यतिरिक्त, इतर अनेक स्टार्स होते ज्यांनी शोमध्ये आपली उपस्थिती दर्शविली.

त्यात मीजान जाफरी, युलिया वंतूर, अर्पिता खान शर्मा, जॅकलीन फर्नांडिस, डायना पेंटी, मिथिला पालकर आणि वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हे देखील दिसले होते.

Malaika Arora

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, छैय्या छैय्या गाण्याने लोकप्रियता मिळवलेल्या मलायका अरोराने तिच्या करिअरमध्ये अनेक आयटम डान्स केले आहेत. अनारकली डिस्को चली, मुन्नी बदनाम हुई यासह अनेक सुपरहिट गाण्यांचा ती भाग आहे.

याशिवाय तिने इंडियाज बेस्ट डान्सर, झलक दिखला जा आणि नच बलिए यांसारख्या शोमध्ये जजची भूमिका साकारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT