Malayalam Movie Jallikattu Gets Entry In Oscars Awards 2021 
मनोरंजन

बॉलीवूडचा नव्हे टॉलीवूडचा ‘जलिकट्टू’ ऑस्करला

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या ऑस्करच्या शर्यतीत भारतीय चित्रपटांच्या वाट्याला निराशा आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय चित्रपटांना वाट पाहावी लागली आहे. दरवर्षी भारतातून किमान एखादा सिनेमा त्या पुरस्कारासाठी पाठविण्यात येतो.त्यासाठी खास ऑस्कर समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र आपल्याकडे बॉलीवूड, टॉलीवूड यांच्यातील वाद जगजाहीर आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच अनेक चित्रपटांची कॉपी करणा-या बॉलीवूडमध्ये एवढे रथी महारथी असतानाही ऑस्करसाठी प्रतिक्षा करावी लागली आहे.

आता ऑस्करसाठी बॉलीवूडच्या नव्हे तर टॉलीवूडच्या एका चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. यंदा ऑस्करसाठी भारतातून मल्याळम भाषेतील ‘जलिकट्टू’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ऑस्करसाठी  देशभरातील 27 चित्रपटांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला आहे.

फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करणार आहे. या चित्रपटाची कथा दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टू या खेळावर आधारित आहे.जगभरातील अनेक दिग्दर्शक, निर्माते, अभिनेता या सर्वांना ऑस्कर मिळावा अशी इच्छा असते. काहींचे ते स्वप्न असते.  ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑक्टोंबर 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात Antony Varghese, Chemban Vinod Jose, Santhy Balachandran, Jaffar Idukki यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी काम केलं आहे.

खिळवून ठेवणारे कथानक, पटकथा आणि अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  इतर देशांमध्ये हा चित्रपट अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजीत डब करुन प्रदर्शित झाला होता फिल्म फेडरोशन ऑफ इंडिया’नं ऑस्कर स्पर्धेसाठी या ‘जलिकट्टू’ची निवड केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT