Malia Obama Latest News esakal
मनोरंजन

Malia Obama changed name : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या लेकीनं बदललं नाव; काय आहे कारण?

ओबामांची लेक मलियानं तिचं नाव बदलल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्या मागील कारणही मोठं भन्नाट आहे.

युगंधर ताजणे

Malia Obama changed name : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama Daughter) यांची लाडकी लेक मलिया ओबामानं तिचं नाव बदलल्याची चर्चा होऊ लागली आहे. तिनं हॉलीवूडमध्ये जाण्यापूर्वी आपल्या नावात बदल केल्याचं बोललं जात आहे.

मलिया ओबामाच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच (Malia Obama) हॉवर्डमधून उत्तीर्ण झालेल्या मलियानं फिल्ममेकिंगमध्ये आपलं करिअर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सगळ्यात तिनं तिचं आडनाव ओबामा बदलून ते अॅन केल्याच्या चर्चेला उधाण केलं आहे. मलियानं हा निर्णय का घेतला असावा याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

ओबामा या कुटूंबाभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय, त्या नावाचा दरारा आणि आदरयुक्त भीती यामुळे तिनं नाव बदलून वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, मलियानं हॉलीवूडमधील एक ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न केलाआहे. यापूर्वी काही सेलिब्रेटींच्या मुलांनी त्यांची नावं बदलल्याचे दिसून आले आहे.त्यात निकोलस केज ज्यानं आपलं स्टेजवरील नाव कोपोला असे केले. दुसरीकडे अँजेलिना जोली जिनं आपलं वोईट नावाचं आडनाव टाकून दिलं होतं.

मलिया ओबामानं तिचं आडनाव वगळलं....

हे सरप्राईज तेव्हा समोर आलं जेव्हा तिच्या चित्रपटाचा प्रीमिअर पार पडला. २५ वर्षीय मलियाचं नाव फिल्ममेकर मलिया अॅन म्हणून घेतलं गेलं. आणि स्पॉटलाईट मलियावर होत्या. त्या सोहळ्याला ओबामा कुटूंबीय अनुपस्थित होते म्हणून बरं..अशी चर्चा त्या २०२४ मधल्या सुदान्स फिल्म फेस्टिव्हलच्या वेळेस रंगली होती.

द हर्ट - मलिया अॅन (The Heart by Malia Ann)

मलिया अॅननं हॉलीवूडमध्ये इंट्री करण्यापूर्वीच नाव बदललं आणि त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे. खरं तर त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळे प्रश्नही विचारले आहेत. मलियाच्या शॉर्ट फिल्मचे नाव द हर्ट असे आहे. त्याचं सादरीकरण सदान्स चित्रपट महोत्सवामध्ये होणार असल्याची चर्चा आहे.

मलियाच्या चित्रपटातून जोशुआची कथा सांगण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं. चित्रपटामध्ये ती भूमिका टुंडे अॅडबिम्बेनं साकारली आहे. आईच्या निधनानंतर जोशुआनं मोठ्या प्रयत्नानं त्याची वेगळी वाट तयार केली. तो अशा लोकांना भेटला ज्यांच्यामध्ये त्याला आईचं काम, तिची प्रेरणा अन् जिद्द दिसायची. तिच्या मृत्यूपूर्वी अनेक गोष्टी तिला सांगण्याचा जोशुआचा विचार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT