Manasi Naik Instagram
मनोरंजन

Manasi Naik: 'खूप वर्ष वाट पाहिली शेवटी..', मानसी नाईकनं दिली Good News..

मानसी नाईक तिचा घटस्फोट आणि नवरा प्रदीप खरेरा सोबत सुरु असलेल्या वादामुळे जोरदार चर्चेत आहे. सध्या तिची एक पोस्ट व्हायर झाली आहे.

प्रणाली मोरे

Manasi Naik: मोठे बोलके डोळे, सुंदर चेहरा आणि उत्तम नृत्यांगना म्हणून ओळख असलेली मानसी नाईक आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

मानसीचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त मानसी फॅन्ससाठी खास गिफ्ट घेऊन आली आहे. मानसी एका हिंदी वेब फिल्ममध्ये दिसून येणार आहे. फिल्मचं पोस्टर आजच्या खास दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. (Manasi Naik post hindi web series sifer)

पी ए एन्टरटेन्मेंट निर्मीत या फिल्मचं नाव सिफर असं आहे. या फिल्ममध्ये मानसी एका महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

या भूमिकेबद्दल मानसी सांगते, ‘’सिफरचा अर्था शून्य असा आहे, एका अनाथ मुलीचा प्रवास यातून दाखवण्यात आला आहे. याला सिफर का म्हटलं आहे, ते ही फिल्म पाहूनच लक्षात येईल.वाढदिवसाच्या दिवशी या फिल्मची घोषणा करताना मला आनंद होत आहे.’’

फिल्मचं शूटिंग लवकरंच सुरू होणार आहे. या भूमिकेचे खूप टप्पे आहेत मानसीला खूप दिवसांनी अशी भूमिका मिळाली आहे. मानसी या बद्दल म्हणते की, ‘’मला ही भूमिका मिळायला बरीच वर्षे वाट पाहायला लागली. गेली अनेक वर्षे डान्सर म्हणून लोकांनी जास्त ओळखलं आहे. पण या भूमिकेमुळे वेगळी मानसी दिसून येईल. ‘’

चैतन्य आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मीती असलेली या फिल्मचे दिग्दर्शन विनोद वैद्य यांनी केले आहे. तर धनंजय कुलकर्णी याचे डीओपी आहे. या फिल्ममध्ये हिंदीतील नामवंत कलाकार आहेत, या बद्दल लवकरच खुलासा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT