Mandira Bedi Valentine Post viral Instagram
मनोरंजन

Valentine Day 2023: 'आज आमच्या लग्नाचा 23 वा वाढदिवस..',दिवंगत पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीची भावूक पोस्ट

2021 साली मंदिरा बेदीचा पती दिग्दर्शक-निर्माता राज कौशल याचे हार्टअटॅकनं निधन झाले होते.

प्रणाली मोरे

Mandira Bedi Valentine Post viral: व्हॅलेंटाईन डे निमित्तानं आज सोशल मीडियावर सगळीकडे प्रेमाचा बहर आलेला दिसत आहे. आज तिथे सर्वसामान्य नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

बॉलीवूडमधील अनेक सेलिबनी व्हॅलेंटाईन डे निमित्तानं स्पेशल पोस्ट केलेल्या दिसून आलं आहे. या प्रेमाच्या दिवशी मंदिरा बेदी मात्र उदास दिसली. (Mandira Bedi remembers late husband raj kaushal valentine post)

आजच्याच दिवशी मंदिराच्या लग्नाचा वाढदिवस असायचा. आणि ज्याच्यासोबत हा दिवस सेलिब्रेट करायचा तो तिचा नवराच आज तिच्यापासून कोसो दूर आहे..जिथनं तो पुन्हा तिच्याजवळ कधीय येऊ शकत नाही.

गेल्या वर्षी २०२१ साली मंदिराचा पती राज कौशल याचं हार्टअटॅकनं निधन झालं होतं. त्यामुळे अर्थातच १४ फेब्रुवारी हा दिवस मंदिरासाठी तसा प्रिय राहिलेला नाही. मंदिरानं आजच्या दिवशी नवऱ्यासोबतचे दोन जुने फोटो शेअर केले आहेत.

मंदिरा बेदीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. या जुन्या फोटोत मंदिरा आपल्या नवऱ्यासोबत खूप खूश दिसत आहे. पण यंदाच्या व्हॅलेंटाईन डे दिवशी मात्र मंदिराला आपल्या भावना अनावर झाल्या आहेत.

तिनं नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिलं आहे की, ''आज आमच्या लग्नाचा २३ वा वाढदिवस होता''. तिनं हॅशटॅग देत व्हॅलेंटाईन डे लिहिलं आहे. आणि दुःखी मन संबोधित करणारं इमोजी पोस्ट केलं आहे.

मंदिराच्या या भावूक पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिचं सांत्वन केलं आहे.

माहितीसाठी इथं थोडक्यात सांगतो की, मंदिराचा पती राज कौशल याचे निधन ३० जून,२०२१ रोजी झाले होते. तो दिग्दर्शक आणि निर्माता देखील होता.

मंदिरा बेदी आणि राज कौशलनं १४ फेब्रुवारी,१९९९ रोजी लग्नगाठ बांधली होती. दोघांना वीर बेदी आणि तारा बेदी ही दोन मुलं आहेत. २०११ साली या कपलला वीर नावाचा मुलगा झाला तर २०२० मध्ये या जोडप्यानं ४ वर्षाची मुलगी तारा हिला दत्तक घेतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT