मनोरंजन

Manoj Bajpayee : 'तू अजुनपर्यत जिवंत कसा?' मनोज वाजपेयीची पत्नी असं का म्हणाली?

द फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मनोजला बॉलीवूडमध्ये तीस वर्षे पूर्ण झाली आहेत.

युगंधर ताजणे

Manoj Bajpayee bollywood actor bhiku mhatre: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणून मनोज वाजपेयीचे नाव घेता येईल. राम गोपाल वर्मा यांच्या सत्यामध्ये भिक्कु म्हात्रे पासून त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिले नाही. बॉलीवूडमधील पहिल्या फळीचा नेता म्हणून मनोज वाजपेयीचे नाव घ्यावे लागेल.

सध्या मनोज हा त्याच्या गुलमोहर नावाच्या चित्रपटात आणि विजय सेतुपतीसोबत फर्जीमध्ये दिसला होता. द फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मनोजला बॉलीवूडमध्ये तीस वर्षे पूर्ण झाली आहेत.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्यानिमित्तानं मनोजविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींना उजाळा दिला जात आहे. बॉलीवूडमध्ये मोठा अभिनेता होण्यापूर्वी मनोजच्या वाट्याला आलेला संघर्ष प्रचंड मोठा होता. त्याच्या आयुष्यावर एक आत्मचरित्रवजा पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

सत्यानंतर मनोजला खूप साऱ्या ऑफर्स मिळाल्या.मात्र त्याला ज्या हव्या होत्या त्या कधीच मिळाल्या नाही. जसे की प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या ओमकारामध्ये मनोज वाजपेयीला भूमिका करायची होती. मात्र ते काही शक्य झाले नाही.

याविषयी त्यानं कपिलच्या शोमध्ये सांगितले होते. तेव्हा त्याला उपस्थित चाहत्यांनी देखील प्रश्न विचारले होते. यावेळी त्याची पत्नी शबाना त्याला म्हणते की, आतापर्यत एवढ्या लोकांना नाराज करुनही तुला काम मिळते हीच मोठी आश्चर्याची बाब आहे.

मनोजनं एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मी आणि शबाना एकदा गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा ती म्हणाली, तुझ्याबाबत जे काही घडले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. तू आता एवढया काळापासून चित्रपटांमध्ये काम करतो आहेस मोठी गोष्ट आहे. तुझ करिअर एव्हाना संपायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. ते अजुनही वेगानं पुढे सरकते आहे याचा आनंद आहे.s

तू आतापर्यत एवढ्या लोकांना नाराज केले आहे की, तू अजुन जिवंत कसा, असा प्रश्न पत्नीनं मला विचारला होता. मला माहिती आहे की, लोकांना आता ऐकण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यांची ती क्षमता संपली आहे. त्यात मी अनेकांना आतापर्यत नाराज केले आहे. अशावेळी मी त्यांच्या टीकेचा विषय झालो आहे. असे माझ्या पत्नीनं मला म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT