manoj bajpayee join politics was meet lalu prasad yadav and tejaswi yadav in bihar  SAKAL
मनोरंजन

Manoj Bajpayee: लवकरच राजकारणात प्रवेश करणार? मनोज वाजपेयींनी केला मोठा खुलासा

मनोजने नुकत्याच एका मुलाखतीत तो राजकारणात जाणार की नाही याचा खुलासा केलाय.

Devendra Jadhav

Manoj Bajpayee News: मनोज वाजपेयी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. मनोज वाजपेयीने गॅंग ऑफ वासेपूर असो, शूल असो किंवा नुकत्याच रिलीज झालेल्या बंदा सिनेमा असो.. आजवर नेहमीच विविध सिनेमांमधून त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवलीय.

मनोज हा जाणकार प्रेक्षकांचा लाडका अभिनेता. मनोजने नुकत्याच एका मुलाखतीत तो राजकारणात जाणार की नाही याचा खुलासा केलाय.

(manoj bajpayee join politics was meet lalu prasad yadav and tejaswi yadav in bihar)

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीला जेव्हा राजकारणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने खुलासा केला, 'मी राजकारणाच्या क्षेत्रात अजिबात पडत नाही.

मागच्या वेळी मी बिहारमध्ये आलो. तेव्हा मी लालू प्रसाद जी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटलो. तेव्हा लोक आपापल्या परीने अंदाज बांधू लागले.

मी राजकारणात येईन, असे भाकीत त्यांनी केले. मी राजकारणात येणार नाही याची मला 200 टक्के खात्री आहे." याशिवाय मनोज बाजपेयी यांनी भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याबाबत काही गोष्टी सांगितल्या.

मनोज वाजपेयी हे बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेलवा गावचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षी 18 सप्टेंबर रोजी त्यांनी लालू प्रसाद यांची पाटणा येथील त्यांच्या घरी (10 सर्कुलर रोड) भेट घेतली होती.

तेजस्वी यादवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यावर दोघांमधील भेटीची माहिती सर्वांना मिळाली.

तीन राष्ट्रीय आणि चार फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेले बाजपेयी म्हणाले, "मी अभिनेता आहे आणि अभिनेताच राहणार, राजकारणात येण्याचा प्रश्नच कुठे येतो." अशी पोस्ट मनोज यांनी केली.

मनोज बाजपेयी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना भोजपुरी सिनेमात काम करण्याबाबतही सांगितले.

तो म्हणाला, 'मला भोजपुरी सिनेमाचा भाग व्हायला आवडेल. पण हे घडण्यासाठी चांगली स्क्रिप्ट असणे आवश्यक आहे. जेव्हा मला एवढी चांगली स्क्रिप्ट मिळेल तेव्हा मी भोजपुरी सिनेमात नक्की काम करेन."

असा खुलासा मनोज वाजपेयींनी केला. मनोज वाजपेयींची प्रमुख भूमिका असलेला नुकताच रिलीज झालेला बंदा सिनेमा प्रेक्षकांना आवडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT