manoj 
मनोरंजन

मनोज वाजपेयीने केला मोठा खुलासा, 'मी देखील आत्महत्या करणार होतो...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेता मनोज वाजपेयीने बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारुन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र त्याचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक अडचणींचा सामना करत तो आज बॉलीवूडमध्ये पाय रोवून उभा आहे. मात्र नुकताच मनोज वाजपेयीने एक मोठा खुलासा केला आहे. मनोजने म्हटलंय की एक वेळ अशी आली होती की मी देखील आत्महत्या करणार होतो.

एका मुलाखतीत मनोज वाजयपेयीने त्याच्या आत्महत्येच्या विचाराबाबतचा खुलासा केला होता. तो ९ वर्षाचा असल्यापासून त्याला अभिनेता बनण्याची इच्छा होती. मात्र शिक्षण सुरु असल्याने तो असं करु शकला नाही. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला. तिथे त्याने थिएटरमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. अभ्यासासोबत तो अभिनयाचं शिक्षण देखील घेत होता. काही काळानंतर त्याने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामसाठी अर्ज केला. तिथे त्याचा अर्ज ३ वेळा नाकारला गेला. 

मनोजने सांगितलं की त्यावेळी त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येत होते. त्याचे मित्र या दरम्यान त्याला एकटं सोडत नव्हते. त्याच्या सोबतंच झोपायचे. त्याच्या मित्रांनी यावेळी त्याला खूप साथ दिली. मनोजने सांगितलं होतं की जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा एका ऑडिशन दरम्यान एका असिस्टंट डिरेक्टरने त्यांचे फोटो बघून ते फाडले होते आणि ३ प्रोजेक्ट त्याच्या हातून गेले होते. मनोजने सांगितलं की तो आदर्श हिरो या इमेजमध्ये तो बसत नव्हता म्हणून अनेक लोकांना वाटायचं की तो मोठ्या पडद्यावर कधी काम करु शकणार नाही.

सिनेमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मनोज वाजपेयी शेवटचा अभिषेक चौबे यांच्या सोनचिडिया या सिनेमात सुशांत सिंह राजपूतसोबत दिसला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या स्ट्रगल काळातील अनुभव सांगत आहेत.    

manoj bajpayee told once he was close to commit suicide  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT