Manushi Chhillar Cannes Esakal
मनोरंजन

Manushi Chhillar Cannes: जेव्हा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पोहचली भारताची 'सिंड्रेला'! पाहून लोकही झाले शॉक..

Vaishali Patil

Manushi Chhillar Cannes: दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणजेच कान्स चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. यंदा हा 76 वा कान्स चित्रपट महोत्सव आहे.

16 मे पासून सुरु झालेला हा महोत्सव 27 मे दरम्यान होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावेळीही अनेक सेलेब्सनी या रेड कार्पेटवर पदार्पण केले. यामध्ये बॉलिवूड स्टार्सचाही समावेश आहे.

76 वा कान्स चित्रपट महोत्सवात माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनेही हजेरी लावली आहे. तिने कान्समध्ये पदार्पण केले आणि रेड कार्पेटवर सौदर्यांने महोत्सावाची शोभा वाढवली.

पांढर्‍या रंगाच्या ड्रेसमध्ये ती सिंड्रेलापेक्षा कमी दिसत नव्हती. तिचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. तिने नेकपीस आणि कमी मेकअपसह फोवरीचा पांढरा गाऊन घातला होता. तिनं मोठ्या आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर एंट्री करेल.

तिच्या या शोभावंत पोशाखासोबतच तिने स्ट्रॅपी निऑन हील्सही घातली होती. तिने स्टेटमेंट नेकलेससह लूक पूर्ण केला. या लूकमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. मानुषीच्या लूकवर आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

या फोटोंवर नेटकरी कमेंटही करत आहेत. तिच्या या फोटोंना प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने ‘अमेझिंग ड्रेस आणि सौदर्यवती’ अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने लिहिलयं की, "त्या गाऊनमध्ये ती डिस्नेच्या राजकुमारीसारखी दिसत आहे...."

मानुषी व्यतिरिक्त सारा अली खाननेही तिच्या सौंदर्याची झलक दाखवली. ती खूपच सुंदर दिसत होती. उर्वशी रौतेलाही पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली.

ईशा गुप्ता, अनुष्का शर्मा, मृणाल ठाकूर, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, दीपिका पदुकोण, आदिती राव हैदरी आणि प्रियांका चोप्रा देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

मानुषीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

आता मानुषी 'तेहरान' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. याशिवाय वरुण तेजसोबत तिचा 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'ही आहे.

मानुषी छिल्लरने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केल्याने आता तिला नक्कीच याचा फायदा पुढे होईल यात काही शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT