Marathi actor hrishikesh joshi post in After seeing his own rangoli at diwali 2023  SAKAL
मनोरंजन

Hrishikesh Joshi: हे कोण कलाकार आहेत त्यांना.. स्वतःची रांगोळी बघितल्यावर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

हृषिकेश जोशींनी स्वतःची रांगोळी बघितल्यावर खास पोस्ट लिहीलीय

Devendra Jadhav

Hrishikesh Joshi News: दिवाळी सण सगळीकडे उत्साहात साजरा झाला. अनेकांनी दिव्यांची आरास करत, गोडधोड मिठाई - फराळाचा आस्वाद घेत दिवाळी उत्साहात साजरी केली. दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी सुंदर रांगोळी काढली जाते. अशीच एक रांगोळी सध्या चर्चेत आहे.

एके ठिकाणी मराठी अभिनेता हृषिकेश जोशीची खास रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी बघताच हृषिकेश यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीलीय.

हृषिकेश यांनी सोशल मीडियावर रांगोळीचा खास फोटो केला शेअर

हृषिकेश जोशी हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेते. हृषिकेश सोशल मीडियावर सक्रिय असतात. हृषिकेश यांनी इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केलीय.

देऊळ सिनेमात हृषिकेश यांनी टॉम्या उर्फ जांबुवंतरावची भूमिका साकारली होती. मनात आहे निसतं पण बॉडी नाय म्हणती हा टॉम्याचा डायलॉग फेमस आहे.

या डायलॉगचा वापर करत, चांगली रांगोळी काढणं मनात आहे निसतं पण बॉडी नाय म्हणती, अशी खास रांगोळी काढण्यात आलीय.

हृषिकेश जोशींनी रांगोळी काढणाऱ्या कलाकारासाठी केली खास पोस्ट

हृषिकेश जोशीनी या रांगोळीचा खास फोटो शेअर करुन पोस्ट लिहीलीय की, हे जे कोण कलाकार आहेत त्यांना दंडवत..... एखादं पात्र अनेक वर्षे लोकांच्या डोक्यात मनात घर करून राहणं हीच लेखकाला दिलेली पावती असते... जे पात्र गिरीश कुलकर्णी यांनी लिहलं होतं, जे मी फक्त सादर केलं होतं..

एकूणच हृषिकेश यांना रांगोळी आवडलेली दिसत असुन; त्यांनी रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचं कौतुक केलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT