Marathi Actor Santosh Juvekar Post...video  Google
मनोरंजन

Santosh Juvekar Video: 'आता मस्ती जिरवायचीय..', संतोष जुवेकरनं कोणावर साधला निशाणा?

संतोष जुवकेरनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याला दिलेल्या कॅप्शनची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे,

प्रणाली मोरे

Santosh Juvekar Post: अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर भलताच सक्रिय असतो आजकाल. सध्या तो मराठीत कमी पण हिंदी सिनेमांकडे जास्त वळलाय असं म्हणायला हरकत नाही. आलियाच्या 'डार्लिंग'नंतर आता अर्जुन कपूरच्या 'कुत्ते' सिनेमात संतोष दिसणार आहे. मागे ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत त्यानं मराठी दिग्दर्शक-निर्मात्यांवर आपली नाराजगी व्यक्त केली होती.

आपल्याला मराठीत काही मोजके एखाद-दोन निर्माते-दिग्दर्शक सोडले तर बाकीचे लोक काम देत नाहीत असं देखील संतोष जुवेकर म्हणाला होता. त्यामुळे नवीन वर्षातील ' मस्ती जिरवायला सुरुवात करुयात' ही त्यानं केलेली पोस्ट नेमकी कोणासंदर्भात अभिनेत्यानं केलीय हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच लागली असेल आपल्याला. (Marathi Actor Santosh Juvekar Post...video)

संतोष जुवेकर एरव्ही अनेकदा सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी पोस्ट करताना दिसतो. आता देखील त्यानं एक व्हिडीओ पोस्टमधून मस्ती जिरवायची भाषा केलीय. अर्थात आता खरी गम्मत पुढे आहे. बहुधा आपल्यापैकी अनेकांना मस्ती जिरवायची असते ते समोरच्याची...जो आपल्याला हैराण करतो त्याची. पण इथे संतोषला स्वतःचीच मस्ती जिरवायची आहे बरं का. अर्थात त्याची मस्ती जिरवायची पोस्ट त्यानं आपल्या फिटनेस संदर्भात सांगताना केली आहे

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

संतोष जुवेकरनं एक व्हिडीओ पोस्ट करत त्याला दिलेलं कॅप्शन जुवेकर स्टाईलचंच आहे. त्यानं लिहिलं आहे,'' झाली सगळी मज्जा करून ३१ डिसेंबर ची,

आता केलेली मस्ती जिरवायला सुरवात करूयात. २०२३ दणक्यात जाण्या साठी दणकट राहणं खुप गरजेचं आहे शरीराने आणि मनाने सुद्धा.

आज जरा traffic कमी झालंय शुभेच्छाचं तर म्हंटल आज आपण आपली शुभेच्छांची गाडी काढूयात बाहेर

तुम्हां सर्वांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा 💐 आपलं एकमेकांवर असलेलं हे प्रेम असच कायम आणि अबाधित राहूदे रे महाराजा

बाप्पा मोरया''

संतोष जुवेकरचा '३६ गुण' हा मराठी सिनेमात नुकताच आपल्या भेटीस येऊन गेला. यात संतोष जुवेकर सोबत पूर्वा पवारही अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर बोल्ड अंदाजात दिसली होती. पूर्वा आणि संतोष मधले बोल्ड सीन्सही गाजले. या सिनेमाचं दिग्दर्शन 'धारावी बॅंक' या हिंदी सिनेमाचा दिग्दर्शक समित कक्कडनं केलं होतं. समित हा एकमेव मराठीतला निर्माता-दिग्दर्शक आहे ज्याच्या सिनेमात आपल्याला काम मिळतं असं संतोष जुवेकर मागे ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT