Actress Deepa parab Podcast:  Esakal
मनोरंजन

Deepa parab: अंकुशची मुलीमध्ये इतकी क्रेझ असुनही नातं इतकं घट्ट कसं? दीपानं सांगितला सुखी वैवाहिक आयूष्याचा मुलमंत्र

Vaishali Patil

Actress Deepa parab Podcast:  झी मराठीवरील 'तू चाल पुढं' ही मालिका काही दिवसातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.

एक सर्व सामान्य गृहिणी जेव्हा स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते त्यावेळी तिची जिद्द, तिला होणारा विरोध आणि या सर्वातुन वाट काढत ध्येयाचा पाठलाग करत ती यशस्वी कशी होते हे सर्व उत्तमरित्या या मालिकेत दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिला वर्गात या मालिकेची विशेष क्रेझ आहे.

दरम्यान या मालिकेच्या माध्यमातुन अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबनं पुन्हा मनोरंजन विश्वात जोरदार कमबॅक केलं. तिची लोकप्रियता ही किती आहे हे काही वेगळ सांगण्याची गरज नाही.

नुकतच दीपानं ईसकाळला पॉडकास्ट मुलाखत दिली. यामुलाखचतीत तिनं अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिचा चित्रपट ते मालिकेचा प्रवास, तिचं आणि तिचा नवरा अभिनेता अंकुश चौधरी याचं नात त्याबरोबर तिच्या मुलाविषयीदेखील तिनं या पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या आहेत.

दीपा परबनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीची लिंक बातमीत जोडली आहे. तर ती नक्कीच ऐका..

याच ईसकाळ मुलाखतीत दीपानं तिच्या आणि अंकुशच्या लव्हस्टोरीविषयी ,त्यांच्यातील बॉन्डिंगविषयी आणि तिच्या नात्याविषयी सांगतिलं. तिनं ची लव्हस्टोरीही सांगितली. मात्र प्रेम असतं तिथे भांडणही होतातच यावेळी दीपा ती परिस्थीती कशी हाताळते याबद्दलही ती बोलली.

यावेळी दीपाला विचारण्यात आलं की तुम्ही दोघंही म्हणजेच दीपा आणि अभिनेता अंकुश चौधरी खुप लोकप्रिय आहात. दोघांचे फॅनही खुप आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कुठे इनसिक्योरिटी आहे का असं विचारण्यात आल्यावर तिने सांगतिलं की, 'तुमचा जर नात्यावर विश्वास असेल तर तुमच घर कधीच तुटत नाही. आम्ही दोघंही एकमेकांच्या कामात लूडबूड करत नाही.'

एकंदरित जर तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम आणि विश्वास असेल तर तुम्हाला त्याच्या विषयी काहीच असुरक्षितता नसते. तुमचा त्याच्यावर विश्वास असेल तर तुमचं नात अधिक घट्ट होत असचं सांगण्याचा प्रयत्न तिने तिच्या चाहत्यांना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्कीला पाहिलंय' साध्वी झालेल्या ममता कुलकर्णींचा दावा, गाईबद्दल बोलताना म्हणाल्या...

Sangli Farmer Death : उसाच्या वाड्याच्या वादातून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नाशिक शहरात रात्री पुन्हा गोळीबार; पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू

Anjali Bharti: ‘अनावधानाने शब्द निघाला…’ ; गायिका अंजली भारतींची सोशल मीडियावर माफी, प्रकरण मात्र गंभीर!

Shantilal Suratwala Passed Away : पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन, ७६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

SCROLL FOR NEXT