Marathi Actress Tejaswini Pandit Post On her Bambu Movie Instagram
मनोरंजन

Tejaswini Pandit: 'मला तू खूप आवडतोस पण...', तेजस्विनी पंडीतच्या पोस्टची सोशल मीडियावर रंगली चर्चा

तेजस्विनी पंडीत सध्या चर्चेत होती ती तिनं निर्मिती केलेल्या 'अथांग' या वेबसिरीजमुळे,पण आता तिला कोण आवडतं याची चर्चा नव्या पोस्टमुळे रंगलीय.

प्रणाली मोरे

Tejaswini Pandit :तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील पोस्ट शेअर करत असते. आता तर तिनं निर्माती म्हणूनही सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलंय. 'अथांग' या वेबसिरीजची निर्माती म्हणून पुढे आल्यानंतर 'बांबू' या सिनेमाच्या निर्मितीची धूरा देखील तिनं सांभाळली आहे.

त्यामुळे अर्थातच त्या सिनेमामुळेही ती सोशल मीडियावर चर्चेत होती. पण आता तेजस्विनी तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे,ज्या पोस्टला तिनं कॅप्शन दिलंय...'मला तू खूप आवडतोस पण..'..बस्स...या पोस्टनंतर तेजस्विनी हे का लिहिलंय,कोणासाठी लिहिलंय असे प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. तर चला जाणून घेऊया तेजस्विनीच्या या पोस्टविषयी.(Marathi Actress Tejaswini Pandit Post On her Bambu Movie)

तेजस्विनीं जी पोस्ट केलीय ही तिचा निर्मिती केलेला नवा सिनेमा 'बांबू' बाबत आहे. ज्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. याविषयी तेजस्विनीनं आपल्या पोस्टमधून सूचित केलं आहे. ज्यात अभिनय बेर्डे 'काय' म्हणतोय अन् सिनेमातील नवोदीत अभिनेत्री फक्त त्याच्याकडे हसत एक कटाक्ष टाकतेय..तितक्यात बॅकग्राउंडला गाण्यातील ओळ कानावर पडते...'मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलं नाही...', आता हे पाहिल्यावर आपल्याही तोंडावर पटकनं स्माईल आलंच पाहिजे. कारण अहो ही तर प्रत्येक मुलीच्या तोंडातली घिसीपिटी ओळ आहे,मुलानं प्रपोज केल्यावरची. जगातल्या अनेक मुलींनी ही वापरली असेल.

अर्थात तेजस्विनीनं देखील हाच प्रश्न एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये विचारला आहे. ती म्हणाली आहे,''तिचं फेवरेट वाक्य... तुमच्याबरोबर असं झालंय का ???मला तू खूप आवडतोस पण.......आणि मग लागतात 'बांबू','बांबू' चा टिझर पाहिलात का..?'',सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीच्या 'बांबू' सिनेमाची अन् तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT