Marathi Bigg Boss 4 winner Smita gondkar reveal name
Marathi Bigg Boss 4 winner Smita gondkar reveal name  Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: निकाला आधीच समोर आलं विनरचं नाव?,काय म्हणाली स्मिता गोंदकर?

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४ चं पर्व आता शेवटाकडे प्रवास करत आहे. नुकतंच शो मध्ये शेवटचं एव्हिक्शन पार पडलं ज्यामुळे आरोह वेलणकरला घराबाहेर पडावं लागलं. आणि आता घराला टॉप ५ मिळाले आहेत.

ज्यामध्ये अपूर्वा नेमळेकर,किरण माने,अमृता धोंगडे,राखी सावंत,अक्षय केळकर यांचा समावेश झाला आहे. पण आता मिनिटा-मिनिटाची चुरस रंगणार आहे शेवटच्या दोन दिवसांत,आणि ती पाहताना प्रेक्षकांचे मात्र मनसोक्त मनोरंजन होणार आहे. (Marathi Bigg Boss 4 winner Smita gondkar reveal name )

टॉप 5 ही नावं समोर आल्यावर आता लोक अंदाज लावताना दिसत आहेत ते टॉप 3 मध्ये कोण जाणार याची. यासंदर्भात काही प्रेक्षकांशी आणि काही इंडस्ट्रीतल्या कलाकारांशी बोलल्यानंतर तीन नावं समोर आली ज्यात सर्वासाधारणपणे कॉमन नावं घेतली गेली ती अपूर्वा नेमळेकर,किरण माने आणि अक्षय केळकर यांची.

पण त्यानंतर बिग बॉसच्या घरात जाऊन आलेल्या स्मिता गोंदकरशी संवाद साधला असता तिनं एक पाऊल पुढे जात थेट बिग बॉस मराठी ४ चा विनर कोण याचा अंदाज बांधत एक मनातलं नाव सांगितलं आहे...

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

स्मिता गोंदकर ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधली स्पर्धक..जिनं टॉप 3 पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आता यंदाच्या सीझनमध्ये स्मिता गोंदकर बिग बॉसच्या घरात पुन्हा गेलेली दिसली. यावेळी हेतू होता ते घरात असलेल्या सदस्यांना टेन्शन फ्री करण्याचं.

स्मितानं तेव्हा सगळ्याच सदस्यांशी गप्पा मारल्या अन् आपले अनुभव शेअर केले. त्यानिमित्तानं तिला सर्वच सदस्यांना जवळून अनुभवता आलं. आणि घरातून बाहेर आल्यावर तिला यंदाचा विनर कोण असेल याची चर्चाही कानावर पडली. आणि मग विनर सदंर्भातला तिचा अंदाजही सारखा निघाला त्या एका नावानं.

आता हे सगळं स्मितानं ईसकाळशी बातचीत करताना सांगितलं आहे. स्मिता म्हणाली,'' मी बिग बॉसच्या घरात यंदा गेले ते टेन्शनमध्ये असलेल्या सदस्यांना टेन्शन फ्री करण्यासाठी. मी प्रत्येकाला जवळून पाहिलं,अनुभवलं आणि मग घराबाहेर आल्यावर प्रत्येकाविषयी लोकांमध्ये असलेली क्रेझही अनुभवली.

त्यामुळे माझ्या कानावर पडलेलं विनरचं नाव आहे अपूर्वा नेमळेकर,ज्या नावावर मी देखील माझा अंदाज बांधला आहे,आणि कुठेतरी ते फिलिंग आहे. आता स्मिताच्या या वक्तव्यानंतर खरंच अपूर्वा नेमळेकर जिंकते का याविषयी सर्वांमध्येच उत्सुकता लागून राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT