Babu Movie 
मनोरंजन

Babu Movie Trailer: बाबू नाय... बाबू शेठ!

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे (Viral News On Social Media) मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.

युगंधर ताजणे

Marathi Entertainment: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे (Viral News On Social Media) मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. हटके विषय, तेवढीच वेगळी मांडणी यामुळे गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट विश्वामध्ये ठळक घडामोडी घडताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात मराठी मनोरंजन विश्वाला मोठ्या संकटाला (entertainment news) सामोरं जावं लागलं होतं. यामुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक अडचणीत देखील सापडले होते. आता मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आले आहे. त्यात झिम्मा या चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. काही दिवसांपासून अशाच एका मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्याचे नाव बाबू असं आहे.

सध्या विविध मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच आता (Marathi Actor) त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'बाबू' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. सुरुवातीपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. त्यात आता टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने 'बाबू'विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. हा एक ॲक्शनपट असून यात 'बाबू'ची भूमिका अंकित मोहन साकारत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात रुचिरा जाधव, नेहा महाजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.

आगरी -कोळी भागात घडणारी ही कथा आहे.गावात होणाऱ्या अन्यायाविरोधात, राजकारणाविरोधात 'बाबू' त्याच्या आक्रमक पद्धतीने कशी उत्तरे देतो, हे पाहायला मिळत आहे. गावात नक्की कोणत्या कारणाने आपापसात ही लढाई सुरु आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. यापूर्वी अंकित मोहन ऐतिहासिक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आला आहे, या चित्रपटात मात्र अंकित एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा चांगलाच अंदाज येतोय. यात रुचिरा आणि नेहाची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाची कथा बाबू कृष्णा भोईर यांची असून संवाद आणि पटकथा मयूर मधुकर शिंदे यांची आहे. ॲक्शनचा जबरदस्त धमाका 'बाबू'च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT