मनोरंजन

'होय मी सांगतो भूत आहे'; बापलेकांची होरपळ दाखवणारा 'बळी'

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याचा बळी नावाचा भयपट येत्या 9 डिसेंबरला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्यानं बळी नावाचा भयपट करताना आलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांना शब्दबद्ध केलंय... बळी हा भय़पट प्रेक्षकांना निश्चितच वेगळा अनुभव देईल. आपण पहिल्यांदाच भय़पटात काम करत असलो तरी प्रेक्षकांना बळी प्रभावित करेल. याची खात्री स्वप्नीलला आहे.

स्वप्नील म्हणाला, माझ्या समांतर वेबसीरिजची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. समांतर आणि बळीमध्ये फरक आहे. बळी हा क्लासिक हॉररमध्ये मोडणारा चित्रपट आहे. समांतरच्या यशानं मला आत्मविश्वास मिळाला. मराठी भयपटांना सध्या वेगळ्या पद्धतीनं प्रेक्षक स्वीकारत आहे. श्रीकांत नावाची भूमिका या चित्रपटामध्ये केली आहे. त्याला एक मुलगा आहे. त्याची पत्नी देवाघरी गेली आहे. त्याच्या मुलाला एक आजार आहे. त्यामुळे बाप हताश झाला. काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला दूर जाऊ देणार नाही. यासगळ्यामध्ये बाप लेकाची होरपळ दाखवण्यात आली आहे. तो संघर्ष प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

माझ्याकडे यापूर्वी कुठल्याही मेकर्सनं चांगला भयपट आणला नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा भयपट केला नाही. बळीनं त्या अटी पूर्ण केल्या. कोरोनाच्या काळात प्रेक्षकांची चव बदलली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नवीन काही देण्याचा प्रयत्न आता करावा लागतो. यासाठी बळीच्या निमित्तानं तो करण्यात आला आहे. आता त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार असल्याचेही स्वप्नीलनं यावेळी सांगितलं. मराठीमध्ये भयपट कमी नाहीत. आपण थ्रीलर सिनेमाला भयपट म्हणतो यात गल्लत होते आहे. मी जेव्हा मराठीतला लपाछपी पाहिला तेव्हा मी बळी करण्याचा विचार केला.

बळीचं दिग्दर्शन विशाल फ्यूरिया यांनी केलं असून अ‍ॅमेझॉन ओरिजिनलवर तो येत्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बराण, कार्तिक डी.निशानदार यांच्‍या ग्‍लोबल स्‍पोर्टस् एंटरटेन्‍मेंट अॅण्‍ड मीडिया सोल्‍यूशन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड यांच्याद्वारे करण्यात आली आहे. ‘बळी भारतामध्‍ये आणि जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपट सृष्‍टीमधील सर्वात प्रख्‍यात कलाकार स्‍वप्‍नील जोशी, पूजा सावंत, समर्थ जाधव असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT