dry day movie song
dry day movie song 
मनोरंजन

'ड्राय डे' सिनेमातील गाणे लाँच

सकाळ डिजिटल टीम

हल्ली मराठी चित्रपटांच्या हटके नावाचा ट्रेंड रुजू झाला आहे. या हटके नावांमुळे चित्रपटांची प्रसिद्धी अधिक होत असल्याकारणाने, मराठी सिनेमांच्या या अद्भुत नावांचे स्वागतदेखील सिनेरसिक करताना दिसून येत आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा देखील याचे उत्तम उदाहरण आहे.

येत्या १३ जुलै रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील  'दारू डिंग डांग' हे गाणे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर आणि टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत आहे. हिंदीचे प्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांच्या भारदस्त आवाजात सादर झालेल्या या गाण्याच्या ठेक्यावर प्रत्येकजन ताल धरत आहे.  तसेच, अनेक पार्ट्यांमध्ये हे गाणे मोठ्याप्रमाणात वाजवले जात आहे. ऋत्विक केंद्रे, मोनालिसा बागल, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, चिन्मय कांबळी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याची कॉरीयोग्राफी आघाडीचे नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य याच्या तालमीत तयार झालेले राहुल आणि संजीव या जोडीने केली असल्यामुळे, हे गाणे दमदार झाले आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतल्या या 'ड्राय डे' चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे. संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात चिन्मय कांबळी, मोनालिसा बागल, आयली घिए,अरुण नलावडे, पार्थ घाडगे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पहायला मिळणार आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT