Raavrambha, Raavrambha movie, Raavrambha full movie, Raavrambha music launch, Raavrambha full starcast, Raavrambha showtimings SAKAL
मनोरंजन

Raavrambha Movie: रंगमंचावर अवतरले महाराजांचे मावळे.. ‘रावरंभा’चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा

१२ मे पासून 'रावरंभा' ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात बघायला मिळेल.

Devendra Jadhav

Raavrambha Movie Music Launch News: हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी ,मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत.

आजवर पावनखिंड, फत्तेशीकस्त, शेर शिवराज अशा अनेक मराठी ऐतिहासिक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारलीच शिवाय प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळवलं.

आता मराठी मनोरंजन विश्वात एक नवीन सिनेमा येऊ घातलाय तो म्हणजे रावरंभा.

(marathi movie Raavrambha Movie launch ceremony film cast special performance)

हेही वाचा: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनेकदा रणभूमीवर समशेर फिरवून शत्रूंना नामोहरम करणाऱ्या योद्धांची कथा आपल्याला माहित असते.

पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट क्वचित आपण ऐकतो.

कित्येक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आहे. स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची रांगडी प्रेमकहाणी उलगडून दाखविणारा ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.

तत्पूर्वी या प्रेमकथेचे मोरपंखी पान उलगडून दाखविणारा रावरंभा सिनेमाचा भव्य म्युझिक लाँच सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

याप्रसंगी रंगमंचावर शिवकाळ अवतरला. म्युझिक लाँचचे औचित्य साधून चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिक वेशात रंगमंचावर येत आपल्या भूमिकेची छोटीशी झलक उपस्थितांना दाखविली.

‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा ‘रावरंभा’ चित्रपटातून उलगडणार आहे.

चित्रपटातील गीतांना आपल्या मातीचा गंध असून शिवकाळात घेऊन जाणारी, मनाला भिडतील अशी ही गाणी करताना खूप समाधान लाभल्याची भावना संगीतकार अमितराज आणि गायिका आनंदी जोशी, गायक रवींद्र खोमणे यांनी यावेळी व्यक्त केली.

‘साथ साथ’, ‘हां मर्दा’ अशी स्फुरण चढणारी गीते आणि ‘तुझ्या दावणीला’, ‘एक रंभा एक राव’ या प्रेमगीताचा नजराणा चित्रपटातील गीत-संगीतातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीतकार अमितराज यांनी ही सर्व गीते संगीतबद्ध केली आहेत. व्हिडिओ पॅलेसकडे चित्रपटाच्या गीताचे हक्क आहेत.

‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. १२ मे पासून 'रावरंभा' ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात बघायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT