tamasha movie  esakal
मनोरंजन

Tamasha Live Teaser: 'कुणीतरी पडलं तरच बातमी रंगते...'

मराठी मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. सध्या एकापाठोपाठ दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे.

युगंधर ताजणे

Marathi Entertainment : मराठी मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. सध्या एकापाठोपाठ दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठी दिग्दर्शक संजय जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपट तमाशा लाईव्हचा टीझर व्हायरल झाला आहे. संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) या चित्रपटातील 'चित्रपटाची नांदी' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा भन्नाट टीझर (Teaser Viral On Social Media) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये सिद्धार्थ म्हणतो बातमी तर रंगणारच… सोनाली आणि सचितही एकच वाक्य बोलत आहेत, आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार? हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना २४ जूनला मिळणार आहे. याशिवाय ‘तमाशा लाईव्ह'मध्ये सचित आणि सोनालीचा रॉकिंग डान्सही पाहायला मिळत आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे.

'तमाशा लाईव्ह'बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, '' 'तमाशा लाईव्ह'च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार, तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड लाभली आहे. चित्रीकरणाआधी आमची अडीच महिने कार्यशाळा सुरु होती. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच या कलाकारांना व्यक्तिरेखेशी एकरूप होणे जरा कठीण जात होते. त्या व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय मिळत नसल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त होत होती. मात्र अडीच महिन्यांनी हे चित्र पूर्णपणे पालटले. मला आठवते, चित्रीकरण संपल्यानंतर एकदा एडिटला बसल्यावर मला सोनालीची एक लाईन सापडत नव्हती आणि ती त्यावेळी एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. मी तिला फोन केला आणि अल्पावधीतच तिने मला व्हॉट्सअपवर संपूर्ण सीन रेकॉर्ड करून पाठवला. एवढी ती त्या व्यक्तिरेखेशी एकरूप झाली होती आणि तीच नाही तर चित्रपटातील प्रत्येक कलाकार अडीच महिन्यांनी आपापल्या व्यक्तिरेखेशी जोडले गेले होते.''

'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ज्या वेळी संजय जाधवने 'तमाशा लाईव्ह'ची संकल्पना मला ऐकवली, तेव्हाच मला यात काहीतरी अफलातून असल्याचे जाणवले. 'तमाशा लाईव्ह' या धमाकेदार नावातच खूप काही दडले आहे. जे चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना कळेलच. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेची निवड ही अतिशय अचूक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शास्त्रीय संगीतातील शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर हे दिग्गज एकत्र आले आहेत. त्यामुळे हा एक खूप भव्यदिव्य असा जागतिक पातळीचा चित्रपट आहे. संजय जाधवच्या डोक्यात काही गोष्टी पक्क्या असल्याने त्या चित्रपटात उतरवणे त्याला खूप सोपे जाते आणि त्यातूनच मग एक उत्तम कलाकृती घडते.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT