Marathi Movie Y Actress Mukta Barve  esakal
मनोरंजन

चिमुकल्यांच्या भेटीनं मुक्ता भारावली! ‘वाय’ चा अनोखा पाहुणचार

अभिनेत्री मुक्ता बर्वे ही नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

युगंधर ताजणे

Marathi Movie: अभिनेत्री मुक्ता बर्वे ही नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. तिचा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. अल्पावधीतच तिनं मोठ्य़ा प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तिच्या वाय या आगामी चित्रपटाची (Marathi Actress Mukta Barve) प्रेक्षकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ या चित्रपटाचे चित्तथरारक टीझर (Entertainment News) झळकले. टिझर बघून चित्रपटातील गूढ जाणून घेण्याची इच्छा अधिकच तीव्र होऊ लागली. ‘वाय’चे पोस्टर हातात धरून अनेक मान्यवरांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आणि आता या चित्रपटाला एका सामाजिक संस्थेनं अगदी आगळ्यावेगळ्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने ‘स्नेहालय’, ‘स्नेहांकूर’ आणि ‘युवान’ या लहान मुलांच्या सामाजिक संस्थेला नुकतीच भेट दिली. यावेळी मुक्ताने तिथल्या लहान मुलांसोबत काही क्षण घालवले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत काही किस्से शेअर केले. या संस्थेकडूनही तिला एक अनोखी भेट देण्यात आली. तिच्या २४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या चित्रपटाचे अक्षर बनवून त्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. मुक्ताने त्यांची ही भेट खूप आनंदाने स्वीकारली.

कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर यांचेच आहेत. सामाजिक संस्थांना दिलेल्या भेटीबद्दल मुक्ता बर्वे म्हणते, ‘’हा अनुभव माझ्यासाठी खूप काही देणारा, शिकवणारा होता. या मुलांना भेटून मन भरून आलं आणि तितकीच त्यांच्याकडून प्रेरणाही मिळाली. रक्ताची नाती नसतानाही ही मुलं इथे इतकी मिळून मिसळून राहतात, याचं विशेष कौतुक वाटलं. या लहानग्यांसोबत घालवलेला क्षण खूप मौल्यवान असून या सर्वांनी ‘वाय’ला दिलेल्या शुभेच्छाही माझ्यासाठी खास आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT