Big Boss 4 marathi Tv Shows esakal
मनोरंजन

'Big Boss 4’ ला मागे टाकत दीपा,अरुंधती बनल्या टीआरपीच्या 'बॉस'...

टॉप १० मध्येही स्थान मिळवण्यास 'बिग बॉस मराठी ४' अयशस्वी...

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस' म्हटंल की भल्याभल्या शोच्या टीआरपी खाणारा शो. बिग बॉस सुरु होताच कितीही हिट मालिका असो तिची टीआरपी घटतेच... असं काहिस चित्र दर वर्षी आपल्याला पहायला मिळायचं, मात्र यंदा हे चित्र काहिस बदलंय... मराठी मालिकांन समोर बिग बॉसची जादू फिकी पडलेली दिसतेय. 'बिग बॉस मराठी ४' टॉप १० मध्येही स्थान मिळवु शकलेला नाही. त्यामुळे बिग बॉसचा मराठी सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास अयशस्वी ठरला आहे तर दीपा आणि अरुंधतीने टीआरपीच्या यादीत  स्थान मिळवलं आहे.

'रंग माझा वेगळा' या मालिकेने पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकांवर ‘फुलाला सुगंध मातीचा' हि मालिका आहे. 'आई कुठे काय करते' पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.चौथ्या क्रमांकावर 'तुझेच मी गीत गात आहे ' हि मालिका आपले स्थान मिळवण्यास यशस्वी झाली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरी आणि जयदीप प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अशस्वी झाले आहेत. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न आणि अनिरुद्ध व संजनाचा घटस्फोट यांमुळे 'आई कुठे काय करते’ या मालिकेतच्या टीआरपीत कमालीची वाढ झाली आहे.

'बिग बॉस मराठी ४' च्या ग्रॅण्ड प्रीमिअर वेळी शोची टीआरपी फक्त ४. १ एवढाच होता. पहिल्या आठवड्यात टीआरपी ३ वर पोहचला. नेहमीच बिग बॉस सुरु झाल्यानतंर त्यांला प्रेक्षकांचा तगडा प्रतिसाद मिळतो मात्र आता टीआरपीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शोचे निर्माते आणि महेश मांजरेकर शोमध्ये काही बदल करतात का? कशा प्रकारे ते पुन्हा टीआरपीच्या यादीत आपलं नावं मिळवतात ? हे जाणुन घेणे उत्सुकतेचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: बीएमसी रणांगणात महायुतीचा मास्टरप्लॅन! भाजप आणि शिंदेसेनेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; कोण किती जागा लढवणार?

Yogi Adityanath : औरंगजेबाची मोठी घोडचूक काय होती? वीर बाल दिवसानिमित्त योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल!

शेतकरी कर्जमाफीसाठी बॅंकांची माहिती तयार! ३० जून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश; नियमित कर्जदारांना मिळणार ‘हा’ लाभ

आजचे राशिभविष्य - 28 डिसेंबर 2025

Panchang 28 December 2025: आजच्या दिवशी मंजिष्ठ, केशर किंवा रक्तचंदन पाण्यात टाकून स्नान करावे

SCROLL FOR NEXT