मनोरंजन

सोहमसाठी पुन्हा उघडणार घराचे दरवाजे?

घरी येण्यासाठी सोहमचे प्रयत्न सुरु

शर्वरी जोशी

छोट्या पडद्यावरील 'अग्गबाई सूनबाई' aggabai sunbai या मालिकेत सध्या अनेक घटना घडताना पाहायला मिळत आहेत. इतके दिवस आसावरीपासून लपून राहिलेलं सुझेन आणि सोहमचं प्रेमप्रकरण उघड झालं आहे. त्यामुळे आसावरीने सोहमला घरातून आणि कंपनीमधून बाहेर काढलं आहे. मात्र, तरीदेखील सोहमला त्याची चूक उमगली नसून आता तो आईविरोधातच सूड भावनेने पेटून उठला आहे. विशेष म्हणजे यावेळी आजोबांच्या मदतीने त्याने आसावरी राजेंना धडा शकवण्याचा निर्धार केला आहे.(marathi-serial-aggabai-sunbai-latest-update-asawari-and-soham-war)

वटपौर्णिमेच्या दिवशी सुझेन आणि सोहम यांच्यातील नातं आसावरीसमोर उघड होतं. त्यामुळे त्याच दिवशी आसावरी सोहमला घराबाहेर हकलून देते. केवळ इतकंच नाही तर त्याच्यासाठी कंपनीचे दरवाजेदेखील बंद करते. त्यामुळे आता राहण्याची आणि नोकरीची सोय नसल्यामुळे सोहमवर रस्त्यावर रहाण्याची वेळ आली आहे. परिणामी, आता तो पुन्हा घरी येण्यासाठी प्रयत्न करु लागला आहे. मात्र, आसावरीने त्याने घरात पाऊल ठेवायचं नाही असं निक्षून सांगितलं आहे. त्यामुळे आता सोहम आजोबांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन घरात शिरण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, आजोबा सध्या गावी गेले असून घरी परतल्यानंतर ते सोहमची विचारणा करतात. यावेळी घरातील प्रत्येक जण सोहम कामानिमित्त बाहेर गेल्याचं सांगतात. मात्र, बबडू घडलेला प्रकार आजोबांच्या कानावर घालतो आणि ते ऐकल्यावर आजोबांना चक्कर येते. इतकंच नाही तर सोहमला परत बोलाव असा हट्टदेखील ते करतात. परंतु, आजोबांच्या हट्टापुढे आसावरी नमेल का? शुभ्राला खरंच न्याय मिळेल का? की आजोबांच्या हट्टापायी आसावरी तिच्या तत्वांना मुरड घालेल. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack in Satara : पाटण तालुक्यात बिबट्याची दहशत! गवत कापणाऱ्या महिलेवर झडप; हाताचा तोडला लचका, अचानक झालेल्या हल्ल्याने...

Beed News: बीडमध्ये नक्की चाललंय तरी काय? तलावात आढळला अनोळखी मृतदेह; अंगावर एकही कपडा नाही, शरीर पूर्णपणे कुजलेलं...

भाजप आमदाराने मुलाच्या लग्नात वाजवले ७० लाखांचे फटाके, शाही लग्नसोहळ्यातील VIDEO VIRAL

लग्नसंस्थेवर आधारित लग्नाचा शॉट या नव्या सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज

8th Pay Commission Explained: पगार किती वाढणार? उशिरा लागू झाला तर थकबाकी किती मिळेल? पगारवाढीचं संपूर्ण गणित उघड

SCROLL FOR NEXT