Kranti Redkar Esakal
मनोरंजन

Kranti Redkar: अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी.. ओळखीच्याच व्यक्तीने केला हात साफ..

Vaishali Patil

अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकर हिनं मराठी मनोरंजन विश्वात स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच आपल्या घरचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते .त्या व्हिडिओमुळे ती चर्चेतही असते. मात्र सध्या ती वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरात चोरी झाली आहे. तिच्या घरात चोरी झाल्याचं प्रकरण आताच समोर आलं आहे. त्याच बरोबर ही चोरी कोणी केली आहे त्याव्यक्तीचं नावं ही समोर आलं आहे. तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरनीने ही चोरी केली आहे असा आरोप क्रांतीने केला आहे.

तिच्या घरातील काही मौल्यवान साडेचार लाख रुपये किमतीचे घड्याळं चोरी झाल्याचं तिच्या नजरेस आलं. क्रांतीने स्वत:हा याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हाची नोंद केली असून आता प्रकरणातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत

याप्रकरकणाबद्दल पोलिसांनीही काही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती रेडकर यांनी एका एजन्सी मार्फत घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. मात्र काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना योग्य संधी साधत तिने ही चोरी केली. त्यानंतर ही महिला फरार झाली आहे. आता गोरेगाव पोलीस त्या महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजन्सीचा तपास करत असून त्या महिलेचा देखील शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा प्रवास सोपा नव्हता; वडिलांनी सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Pune: वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त; पिंपरे परिसरात पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : बारामतीत कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता; ट्रकभर कांदा मेंढ्यांना चारा म्हणून

SCROLL FOR NEXT