Farhan Akhtar, Shibani Dandekar Google
मनोरंजन

'फरहानशी लग्न करण्यामागे माझा स्वार्थ'; शिबानी दांडेकरची पोस्ट चर्चेत

फरहान आणि शिबानीनं खंडाळा येथील फार्महाऊसवर निमंत्रितांच्या उपस्थितील लग्नगाठ बांधली होती.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये(Bollywood) असे कितीतरी कपल्स आहेत ज्यांचे लग्नसोहळे(Marraige Ceremony) गाजले. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले फरहान-शिबानी हे देखील त्यापैकी एक कपल आहे. फरहान अख्तर(Farhan Akhtar)आणि शिबानी दांडेकर(Shibani Danekar) गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करीत होते. तब्बल तीन वर्षांनंतर त्या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आणि खंडाळा येथील जावेद अख्तर यांच्या आलिशान फार्महाऊसवर लग्नगाठ बांधली. दोघांचं लग्न अगदी साध्या पद्धतीत,मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडलं, पण तरीही ते थोडं वेगळ्या अंदाजात झालं म्हणून चर्चेतही आलं होतं.

फरहान-शिबानीनं ख्रिश्चन पद्धतीत लग्नगाठ बांधली पण तरीही त्यांनी एकमेकांना स्वतः लिहिलेली काही खास वचन दिली. ती वचनं त्यांनी सर्वांसमोर बोलून दाखवली. आणि त्यामुळेच त्यांचा लग्नसोहळा विशेष ठरला होता. त्यांच्या लग्नाला हृतिक रोशन,फराह खान जी फरहानची मावस बहिणही आहे ती देखील आवर्जून उपस्थित राहिली होती. मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत साजऱ्या पडलेल्या यांच्या लग्नसोहळ्यानं सोशल मीडियावर मात्र चांगलीच पसंती मिळवली. त्यांच्या लग्नासंदर्भातल्या अनेक फोटोनी चाहत्यांची वाहवा मिळवली. त्यानंतर शिबानीचं मिसेस.अख्तर हे नवं इन्स्टाग्रामवरचं नाव चर्चेत आलं, तिच्या एका फोटोवरनं ती लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याची बातमी चर्चेत आली. या बातमीला शिबानीनं उत्तर देत शांत केलं पण आता पुन्हा तिच्या एका पोस्टमुळे गोंधळ उडाला आहे. काय आहे नेमकी ती पोस्ट?

Shibani Dandekar Instagram story Image- Shibani with Farah Khan

फराह खान ही फरहानची मावस बहिण. म्हणजे फराहची आई मेनका आणि फरहानची आई हनी ईराणी या दोघी सख्ख्या बहिणी. त्यामुळे शिबानीनं फराह सोबतचा लग्नातला एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं,''फरहानशी लग्न फक्त तु माझी नणंद होणार म्हणून केलंय...''आणि तिनं खूप असे फनी,हार्ट इमोजी पोस्ट केलेयत. आता सगळ्यांनाच माहिती आहे फरहानसारखीच फराहसुद्धा बॉलीवूडमधील यशस्वी दिग्दर्शिका,निर्माती आणि नृत्य दिग्दर्शिका देखील आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शिबानीच्या पोस्टसंदर्भात मिश्र प्रतिक्रियांचे सूर उमटत आहेत. कोणी तिची ही पोस्ट हसण्यावारी नेली आहे तर कुणी उगाचच तिच्यातनं गंभीर अर्थ काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT