Masoom Movie Boman Irani Trailer  esakal
मनोरंजन

Masoom Trailer: 'इन्सान की सच्चाई सीधी नही होती! गुंगवून टाकणारा 'मासूम'!

अनेक दर्जेदार थ्रिलरपटांसोबत अव्वल स्थान निर्माण केल्यानंतर, थ्रिलर, मासूमसह आणखी एक धमाका करण्यासाठी तयार झाली आहे.

युगंधर ताजणे

Video Viral: अनेक दर्जेदार थ्रिलरपटांसोबत अव्वल स्थान निर्माण केल्यानंतर, थ्रिलर, मासूमसह आणखी एक धमाका करण्यासाठी तयार झाली आहे. ही मालिका पंजाबमधील फलौली येथील कपूर (Masoom Trailer) कुटुंबाच्या जीवनातील अकथित सत्ये उलगडून दाखवते. ज्यात नातेसंबंधांची गतिशीलता ही काळ आणि महत्त्वाकांक्षेनुसार बदलते. 6 भागांची ही मालिका 17 जून रोजी प्रदर्शित होणार असून प्रतिभावान अभिनेता बोमन इराणी या मालिकेद्वारे आपले डिजिटल पदार्पण करत आहेत. त्यांच्यासोबत नव्या दमाची अभिनेत्री समारा तिजोरी असून वडील आणि मुलीमधल्या गुंतागुंतीच्या नात्याची झलक यातून पाहायला मिळणार आहे.

मिहीर देसाई दिग्दर्शित हॉटस्टार स्पेशल 'मासूम', हे पुरस्कार-विजेती आयरिश (entertainment news) मालिका ब्लडचे भारतीय सादरीकरण आहे, जी कौटुंबिक संबंध आणि कुटुंब गमावल्यानंतर झालेल्या विश्वासघातावर प्रकाश टाकते. या शोची निर्मिती ड्रीमर्स अँड डोअर्स कंपनीच्या बॅनरखाली करण्यात आली आहे, जो रिलायन्स एंटरटेनमेंट आणि (bollywood news) प्रीमियम कंटेंट स्टुडिओचा भाग आहे. गुरमीत सिंग याचे शोरनर असून यात मंजरी फडणीस, वीर राजवंत सिंग, उपासना सिंग आणि मनुर्शी चढ्ढा आदी प्रमुख कलाकार आहेत. या मालिकेत प्रसिद्ध आनंद भास्कर यांनी रचलेला एक भावपूर्ण साउंडट्रॅक देखील असणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते, बोमन इराणी म्हणाले, “मी डिज्नी+ हॉटस्टारवरील 'मासूम'सोबत डिजिटल क्षेत्रात पदार्पण करतो आहे, जे या वर्षी माझ्या काही आवडत्या सीरिज तयार करत आहेत. ही सीरिज ही एक खिडकी आहे, जी माझ्यासाठी नवीन जग उघडणार असून मला मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवणार आहे. माझी रील लाइफ मुलगी समारा हिच्यासोबत तिच्या वडिलांची भूमिका करणे खूप आव्हानात्मक होते कारण ती खूप तीव्र आणि हिंमतबाज मुलगी आहे. समारासारख्या ताज्या प्रतिभेच्या आणि अत्यंत हुशार कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. एका तरुण अभिनेत्याचा अभिनय साकारताना प्रत्यक्ष पाहणे, माझ्यासाठी आनंददायक होते आणि त्यामुळे, एकप्रकारे मला देखील प्रगल्भ होण्यास मदत झाली.”

दिग्दर्शक मिहीर देसाई म्हणाले, "मुलीचा सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न जेव्हा तिचे संपूर्ण कुटुंब ते लपविण्याचा प्रयत्न करते तेथूनच मासूमची कहाणी सुरू होते. तिच्या आईचे अकाली निधन हे कौटुंबिक रहस्ये उलगडण्यासाठी उत्प्रेरक ठरते. बोमन इराणी आणि समरा तिजोरी यांच्यासोबत काम करताना मला आनंद झाला जे या मालिकेत वडील-मुलीचे हृदयस्पर्शी नाते चित्रित करतात.”

अभिनेत्री समारा तिजोरी म्हणाली की, "मासूममध्ये, मी एका तरुण मुलीची भूमिका साकारत आहे जी सत्य समोर आणण्याच्या प्रयत्नात असते जेव्हा तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला ते दाबून टाकायचे आहे. बोमन इराणी माझ्या ऑन-स्क्रीन वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत ही भूमिका साकारणे हा माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता. एका अनुभवी अभिनेत्यासोबत तसेच, अनुभवी कलाकार आणि क्रू सोबत काम केल्यामुळे, मी एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून विकसित झाले आहे. मला आशा आहे की या कथेचा वेग आणि थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT