master movie review starrer Thalapathy Vijay and setupati Vijay one time watch film
master movie review starrer Thalapathy Vijay and setupati Vijay one time watch film  
मनोरंजन

Master Review: मास्टर कुणासाठी? फायटिंग आवडणा-यांसाठी; वन टाईम मस्ट वॉच

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाच्या काळात चित्रपटसृष्टी तोट्यात होती. निर्माते आणि दिग्दर्शक यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागले होते. त्या काळात अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले मात्र त्यांना म्हणावे असे यश मिळाले नाही. बड्या कलावंतांचे चित्रपट यावेळी प्रदर्शित झाले होते. पण त्यांना कमाई करता आली नाही. यासगळ्यात एका सिनेमाची गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. तो प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे तिकिट मिळावे म्हणून चित्रपटगृहाच्या बाहेर रांगा होत्या. त्यावरुन एका थिएटर चालकाला दंड झाला होता. असा हा 'मास्टर' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यानं बॉक्स ऑफिसवर विक्रम रचण्यास सुरुवात केली.

दररोज मास्टर चित्रपटानं किती कमाई केली याची आकडेवारी सोशल मीडियावर प्रसिध्द होत होती. आता तर अॅमेझॉन प्राईमवरही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानं मिळवलेलं  यश चक्रावून टाकणारं आहे. मुळात मास्टर कसा आहे, तो कुणासाठी आहे याचा शोध घेऊ. थलापती विजय आणि सेतूपति विजय यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2 तास 54 मिनिटांचा आहे. वास्तविक एवढ्या लांबवर चित्रपट नेण्याची काही गरज नव्हती. पण दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी दोन्ही विजय यांना समान न्याय देण्याच्या हिशोबानं कथा उगाचच रेंगाळत ठेवली आहे. विजय थलापती म्हणजे मास्टर हा एका कॉलेजात शिकवणारा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. ज्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर आहे. तो इतका आहे की मुलं तो आल्याशिवाय गॅदरिंग सुरुही करत नाही. अर्थात हा सगळा साऊथ मुव्हीजचा वेगळा तडका आहे.

दुसरीकडे विजय सेतूपती ज्यानं भवानी नावाची व्यक्तिरेखा चित्रपटात साकारली आहे. लहानपणी त्याच्या आई वडिलांना काही गुंडानी मिळून मारले आहे. त्याचा बदला तर तो घेतोच याशिवाय आपल्या काळ्या कामांसाठी बालसुधारगृहात ठेवलेल्या मुलांचा वापर करतो. त्यांना नशेबाज करणे, ते कायम गुंगीत कसे राहतील, आपण सांगू ते काम करायला कसे तयार होतील याची काळजी त्यानं घेतली आहे. मास्टर एका प्रसंगात सापडतो आणि त्याला त्या बालसुधारगृहातील मुलांना शिकवण्यासाठी (सुधारण्यासाठी) पाठवले जाते. इथून चित्रपटाला सुरुवात होते. थलापती विजयचा अभिनय, त्याचा डान्स, त्याची स्टाईल हे सारं काही वेळेसाठी आवडून जाते. एखाद दोन गाणीही बरी आहेत. विशेषत विजयचा कॉलेजमधील डान्स छान झाला आहे. 

 मध्यंतरात चित्रपट कमालीचा स्लो होऊन जातो. दर पाच ते दहा मिनिटांनंतर मारधाड आहे. त्याशिवाय दिग्दर्शकाला चैन पडलेलं नाही. तो कायम दोन विजयपैकी कुठल्या एकाला सतत मारामारी करताना दाखवतो. दारुबाज मास्टरच्या आयुष्यात त्या जेलमधील मुलांना शिकवण्यासाठी गेल्यानंतर एक घटना घडते. त्यानंतर त्याच्या जगण्याचा हेतूच बदलून जातो. त्यानंतर तो दारु सोडून देतो. आणि भवानीच्या मागे हात धुवून लागतो. ज्यावेळी हे दोन्ही विजय एकमेकांसमोर उभे राहतात तेव्हा त्यांच्यातील लढाई लक्षवेधी आहे. विजय सेतूपती हा विजय थलापतीपेक्षा उजवा आहे हे सगळ्या चित्रपटभर जाणवते. चित्रपट जरी मास्टर वर आधारित असला तरी भाव विजय सेतूपती खाऊन जातो. पूर्वार्ध विजय थलापतीचा तर उत्तरार्ध विजय सेतूपतीचा असेही म्हणता येईल. पण विजय सेतूपतीचा प्रभाव जाणवतो. एवढं नक्की.

मास्टर हा एक टिपिकल मसाला मुव्ही आहे. ज्यांना अशा प्रकारचे पॉपकॉर्न मुव्ही आवडतात त्यांनी हा मुव्ही जरुर पाहावा. मारधाड, आदळाआपट, तोडफोड, असे सगळे मास्टरमध्ये पाहायला मिळते. डोळ्यांना थोडा निवांतपणा मिळावा म्हणून मास्टरची हिरोईन मालविका मोहनन मध्ये भाव खाऊन जाते. तेवढचं. बाकी दोन्ही विजय मध्ये 'मास्टर' कोण हे दाखविण्यासाठी दिग्दर्शकानं तीन तास घालवले आहेत. हवेतली मारामारी ते पाहून डोक गरगरायला होते. यापूर्वी लोकेश कनगराज याच्या मानगरम आणि कैथी नावाचे चित्रपट हिट झाले होते. त्यानंतर त्यानं मास्टरची निर्मिती केली. जी सध्या प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT