Meenakshi Thapa Murder case mumbai police SIM uttar pradesh
Meenakshi Thapa Murder case mumbai police SIM uttar pradesh 
मनोरंजन

Meenakshi Thapa Murder : सीमकार्डच्या मदतीनं अभिनेत्रीच्या खुनाचा लागला छडा! मुंबई पोलिसांसमोर होतं मोठं चॅलेंज

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Meenakshi Thapa Murder case mumbai police SIM uttar pradesh : मिनाक्षी थापाच्या हत्येची घटना खूपच चर्चेत आली होती. त्या घटनेतील आरोपीपर्यत पोहचणे हे मुंबई पोलिसांसाठी मोठं चॅलेंज होतं. मिनाक्षीचं अपहरण करुन तिचं निर्घूण खून करण्यात आल्याचे दिसून आले होते. आता त्या घटनेतील एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी त्या हत्याकांडाचे महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे.

मिनाक्षीचं वय २४ वर्ष होतं. मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात ती आली होती. मात्र नशीबात काय वाढून ठेवलंय हे तिला माहिती नव्हतं. २०११ सालची ती गोष्ट. मिनाक्षीला काही करुन स्टार अभिनेत्री व्हायचं होतं. त्यासाठी ती मुंबईत आली होती. काही चित्रपटांमध्ये ती दिसलीही होती. करिनाच्या हिरोईनमध्ये ती चमकली होती. त्यानंतर तिची जैसवाल आणि सुरीन यांच्याशी तिची ओळख झाली होती.पुढे हेच दोन मित्र मिनाक्षीला घेऊन उत्तर प्रदेशला गेले होते.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मिनाक्षी थापाची धड नसलेली बॉडी पोलिसांना अलाहाबादमधील एका बंदिस्त टाकीमध्ये आढळली होती. ही घटना आहे १६ एप्रिल २०१२ ची. त्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. आरोपींनी तिच्या शरीराची विदारक अस्वस्था केली होती. त्या घटनेची आठवण येताच अजुनही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तिचं धडापासून वेगळं केलेलं डोकं सोबत घेऊन अलाहाबाद ते लखनौ असा प्रवासही केला होता.

पोलिसांना यासगळ्यात मोठा पुरावा हाती आला तो म्हणजे मिनाक्षीच्या मोबाईलमधील ते सीम कार्ड. ते कार्ड पुन्हा रिटेन करुन पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली. यामुळे धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यानंतर २०१२ सालच्या त्या घटनेवरुन पोलिसांनी अमितकुमार जैस्वाल आणि अलविना अर्फ प्रीती सुरीन यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. मार्च ३, २०१२ रोजी मिनाक्षीनं तिच्या आईला फोन केला होता. त्यावेळई ती जैस्वाल आणि सुरीनसोबत उत्तर प्रदेशला निघाली होती. ती कामायनी एक्सप्रेसनं प्रवास करत होती.

मिनाक्षी जेव्हा अलाहाबादला पोहचली तेव्हा तिनं आईला पुन्हा आपण पोहचल्याचा फोन केला. आणि आपण सुरीनच्या घरी जाणार असल्याचे सांगितले. तो फोन झाला आणि मिनाक्षीचा फोन बंद झाला. तिच्याशी काही केल्या संपर्क होत नव्हता. याबरोबरच जैस्वाल आणि सुरीनचाही फोन बंद झाला. यानंतर मिनाक्षीच्या आईनं पोलिसांशी संपर्क साधला. मिनाक्षीच्या आईला एक निनावी मेसेज केला होता. त्यात म्हटले होते की, तीन दिवसांत पंधरा लाख रुपये मिळाले नाहीतर तुमची मुलगी तुम्हाला दिसणार नाही. असे म्हटले होते.

त्यानंतर मिनाक्षीचा तो व्हिडिओ अपलोड केला जाणार होता. मिनाक्षीची आई घाबरुन गेली होती. आईनं आपल्या मुलाला देखील याविषयी सांगितलं होतं. तो त्यावेळी जम्मु काश्मिरमध्ये सैन्य दलात कार्यरत होता. मिनाक्षीच्या भावानं आणि मित्र आलोक वर्मानं मिसिंग कप्लेंट फाईल केली होती. मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यामध्ये ही केस फाईल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सीम कार्डच्या मदतीनं आरोपीपर्यत पोहचले. आणि एका महत्वाच्या केसचा उलगडा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT