Viral Sunny Leoni Mia Khalifa esakal
मनोरंजन

Viral: केरळ विद्यापीठात मिया खलिफा, सनी लियोनीचा 'क्लास'

मिया खलिफा आणि सनी लियोनी यांची वेगळी ओळख सांगण्याची काही गरज नाही. त्यांची लोकप्रियता मोठी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mia And Sunny Leoni News: मिया खलिफा आणि सनी लियोनी यांची वेगळी ओळख सांगण्याची काही गरज नाही. त्यांची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही सेलिब्रेटी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सनी लिओनी तर आता बॉलीवूडमध्येही चमकली आहे. तिचा मोठा फॅनबेस तयार झाला आहे. तिनं वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्येही रस घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांचा, प्रेक्षकांचा आणि नेटकऱ्यांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याचे दिसून येते आहे.

दुसरीकडे मिया खलिफा तिचा बोल्डनेस अवतार सोडायला तयार नाही. इंस्टा असो वा ट्विटर मिया नेहमीच चाहत्यांना घायाळ करण्याच्या विचारात असते. या दोन्ही सेलिब्रेटी चर्चेत आल्या आहेत याचे कारण त्यांना केरळ विद्यापीठातील एका महाविद्यालयानं दिलेलं निमंत्रण. ते पोस्टर सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. कॉलेजमध्ये मिया आणि चक्क सनी लियोनी असं म्हणताच विद्यार्थ्यांचे कान टवकारले गेले होते. त्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हजेरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

केरळ मधील त्या महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी सनी आणि मियाला कॉलेजमध्ये बोलावल्याचे दिसून आले आहे. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एका वेगळ्याच प्रकारच्या प्रयोगाचे मोठ्या प्रमाणावर कौतूक होताना दिसून येत आहे. त्या महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी नव्यानं प्रवेश घेतला आहे त्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी त्या दोन पाहुण्यांना बोलावण्यात आले होते.

कॉलेजच्या आवारात मोठे फ्लेक्सही लावण्यात आले होते. त्यावर मिया आणि सनीचे फोटो होते. हे सारं नेटवर व्हायरल होताच अनेकांनी डोक्यावर हात लावला आहे तर बऱ्याच जणांनी या अभिनव उपक्रमाचे कौतूकही केले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, हे पोस्टर 2016 चे आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा व्हायरल झाल्यानं ते चर्चेत आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT