Katrina Kaif,Vicky Kaushal, Mika SIngh Google
मनोरंजन

कतरिना-विकीच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी मिका सिंगने कळवला नकार...

आमंत्रण मिळालंय पण मी जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले...काय आहे कारण

प्रणाली मोरे

कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशलचं(Vicky Kaushal) लग्न हे ब्रेकिंग,एक्सक्लुसिव्ह बातम्यांवरनं आता एका रंजक वळणार येऊन ठेपलंय. उद्या ९डिसेंबरला राजस्थानमध्ये शाही थाटात हजारोवर्षे पूर्वीच्या गड-किल्ल्यांच्या इतिहासाच्या साक्षीनं विकी-कतरिना कायमचे एकमेकांचे होणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने या दोघांच्या लग्नातील पेहरावापासून ते मेहंदीपर्यंत,जेवणाच्या मेन्यूपासून ते पाहुण्यांच्या लिस्टपर्यंत अगदी सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीला प्रसिद्धीचं वलय प्राप्त झालं होतं. पण आता जसे लग्नघटिका समीप येत चाललीय तसं कतरिना-विकीच्या लग्नात कोण सेलिब्रिटी परफॉर्म करणार यांची नावं समोर येत चालली आहेत. आता कोणीही यावर स्पष्टपणे बोलत नसलं तरी नेहमी काहीतरी बोलून किंवा कृत्य करून वादात पडणारा सिंगर मिका सिंग यावर बोललाय.

कतरिना-विकीच्या लग्नात उपस्थित राहणा-या एकूण १२० पाहुण्यांच्या गेस्ट लिस्टमधील काही नावं आता हळूहळू कळत आहेत. ज्यामध्ये नेहा धुपिया-अंगद बेदी,कबीर खान आणि कुटुंबिय, तसंच शर्वरी वाघ जी विकीचा भाऊ सनी कौशलची गर्लफ्रेंड आहे असं बोललं जात आहे अशा सर्वांची नावं समोर येत आहेत. काही सेलिब्रिटींनी मात्र आपल्याला आमंत्रण नाही,त्यामुळे आपण जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. कियारा अडवाणी जिनं विकीसोबत 'लस्ट स्टोरीज्' मध्ये काम केलंय,तिनं सांगितलं की, ''आपल्याला आमंत्रण नाही म्हणून आपण जाणार नाही''. तर कॉमेडियन भारतीने दुबईवरनं परत येतानाचा व्हिडीओ पोस्ट करत सोशल मीडियावर आपल्या स्टाईलमध्ये सांगितले की,''कृपया गैरसमज नसावा. आम्ही दुबईहून आमच्या घरी परत जात आहोत,विकी कतरिनाच्या लग्नासाठी जात नाही कारण आम्हाला निमंत्रण नाही''. विकी-कतरिनाच्या लग्नात काही सिंगर परफॉर्म करणार आहेत.

त्यात मिका सिंगचं नाव होतं. त्याला रीतसर लग्नाचं निमंत्रण गेलं होतं. मिका सिंगनं याआधीही बड्या लग्नांमध्ये परफॉर्म केलं आहे. त्यासाठी तो लाखो रुपये घेतो. पण असं काय झालं की चक्क कतरिना कैफ-विकी कौशलच्या रॉयल लग्नात गाण्याासाठी त्यानं नकार दिला. तर याबाबतीत त्याला विचारलं असता तो बोलला,''मला लग्नाचं निमंत्रण आलं आहे. गाण्याच्या परफॉर्मन्ससाठी विचारलं गेलं. पण मी जाणार नाही. कारण त्याचवेळेला मी काही इतर प्रोफेशनल कमिटमेंट केलेल्या आहेत. ज्या मोडून मी लग्नासाठी जाऊ शकत नाही''. आता मिका नाही म्हणालाय तर हरी आणि सुखमणी यांच्यासोबत आणखी कोण कोण परफॉर्म करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT