mika singh birthday, singer abuses journalist swayamvar show press conference sakal
मनोरंजन

Mika Singh Birthday: 'तो' प्रश्न विचारला म्हणून मिकानं पत्रकाराला अक्षरशः शिव्या घातल्या होत्या..

गायक मिका सिंग याचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

नीलेश अडसूळ

Mika Singh Birthday: मिका सिंग हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. त्यानं आता पर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. पण मिका हा कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो.

अंदाजे १७ वर्षांपूर्वीची त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली ानी वादाचे सत्र सुरूच राहिले. साधारण २००६ मध्ये मीकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला राखी सावंत उपस्थित होती यावेळी मिकाने सर्वांसमोर राखीला किस केलं आणि मिकाची मोठी बदनामी झाली.

तेव्हापासून मिकाचे अनेकदा वाद झाले आहेत. त्यामुळे त्याच्याशी बोलतानाही अनेकदा सगळे जापूनच बोलतात. अशा मिकाचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने एक खास किस्सा जाणून घेणार आहोत. जेव्हा मिकाने एका पत्रकाराला अक्षरशः शिव्या दिल्या होत्या.

(mika singh birthday, singer abuses journalist swayamvar show press conference)

बॉलीवूडमधील (Bollywood News) प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) हा नेहमीच चर्चेत राहिलेला दिसतो. सोशल मीडियावरही तो त्याच्या वादामुळे नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी झालेला आहे. आपल्या गायकीपेक्षा नव्हे आक्रसताळे  (Entertainment News) स्वभावाचा फटका त्याला अनेकदा बसला आहे.

आजही लोक त्याला राखी सावंत किस प्रकरणा वरून ट्रोल करताना दिसतात. आजही लोक त्याला त्यावरून डिवचतात. त्यामुळे तो रागामध्ये समोरच्याला काहीतरी बोलून जातो ानी आणखी वाद चिघळतो. असेच एक प्रकरण झाले होते, जेव्हा मिकाने एका पत्रकाराला शिव्या दिल्या होत्या.

झालं असं की मिका बोहल्यावर चढला होता. त्याने स्वतःचे स्वयंवर केले यावेळी. यावेळी त्याच्या प्रमोशनसाठी मिकाने पत्रकार परिषद घेतली होती. मात्र पहिल्याच पत्रकार परिषदेत मिकाने राडा घातला.

त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारानं मिकाला या शो मध्ये, राखी सावंत सहभागी होणार आहे का, असा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न ऐकताच मिकाचा राग अनावर झाला. त्यानं थेट त्या पत्रकारावरच राग काढत त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर मिकाला हे प्रकरण बरेच महागात पडले होते.

पत्रकाराच्या त्या प्रश्नानंतर मिकाचा मुड खराब झाला होता. त्यानंतर त्यानं आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यात काहीच रस नसल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारांमध्ये मिका विषयी चांगलीच नाराजी पसरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT