milind gawali celebrates rakshabandhan 2023 with sister shared emotional post aai kuthe kay karte  SAKAL
मनोरंजन

Milind Gawali: "आई गेल्यानंतर माझं तिच्यासोबत नातं...", मिलिंद गवळींनी सख्ख्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं करुन लिहिली भावुक पोस्ट

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी बहिणीसोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडीओ शेअर केलाय

Devendra Jadhav

Milind Gawali Rakshabandhan Celebration: आज रक्षाबंधननिमित्ताने आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी सोशल मिडीयावर भावुक पोस्ट लिहिली आहे. मिलिंद यांनी बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय.

हा व्हिडीओ शेअर करत मिलिंद गवळी लिहीतात, "रक्षाबंधन / राखी पौर्णिमा.. लहानपणापासून हा सण फारच मोठा सण म्हणून आमच्या घरात मानला जायचा साजरा केला जा, माझी आई दादरच्या मार्केटमधून खूप दिवस आधीच राख्या घेऊन आलेली असायची, अगदी छान डिझाईनच्या राख्या, त्या पण एक-दोन नाही आठ दहा घेऊन यायची. माझी धाकटी बहीण संगीता छान तयारी करून मग मला ओवाळायची, नवीन शर्ट-टी-शर्ट मिळायचे, मग मस्तपैकी बर्फी पेढा किंवा लाडू भरवायची, आणि त्या काळामध्ये माझं आणि साखरेचे काही वैर नव्हतं त्यामुळे मी मनसोक्त त्याचा आस्वाद घ्यायचो, कालांतराने माझ्यात आणि साखरेमध्ये वैर निर्माण झालं."


(milind gawali celebrates rakshabandhan 2023 with sister)

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, "पण माझं आणि माझ्या बहिणीचं नातं अगदी घट्ट घट्ट होत गेलं, आई गेल्यानंतर , संग्या ने आईची जागा घ्यायचा प्रयत्न केला, आजही ती आईचीच जागा घेते आहे. रक्षाबंधन म्हणजे भावांनी बहिणीची रक्षा करायचं वचन तो बहिणीला देत असतो, पण आजपर्यंत माझ्याच बहिणीने माझी रक्षा केली आहे. माझ्या आईची अगदी जीवश्य कंठश्य मैत्रीण जिला मी शानबाग मावशी असं म्हणायचो, दरवर्षी शानबाग मावशी माझ्या पप्पांना राखी बांधायच्या, आणि त्यांच्या दोन मुली सुमेधा आणि सुचित्रा प्रेमाने आम्ही त्यांना राणी पिंकी म्हणतो, त्या दोघी मला राखी बांधायच्या, आज शानबाग मावशी नाहीत आणि माझी आई नाही तरीही राखी पौर्णिमेची परंपरा चालू आहे."

मिलिंद गवळी पुढे लिहीतात आजकालच्या धकाधकीच्या जीवनात , प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी कामात, व्यवसायात गुंतलेला आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्येकाला राहावं लागत आहे,
अशा सणांच्या दिवशी कितीही इच्छा असली तरी एकत्र येणं होत नाही. पण अशा दिवशी बहिणीला भावाची आणि भावाला बहिणींची खूप खूप आठवण येत च असते.

मिलिंद गवळी शेवटी लिहीतात, "माझ्या या सिनेमा क्षेत्रामध्ये सुद्धा माझ्या असंख्य बहिणी आहेत, त्यात अलकाताई म्हणजे हक्काची माझी मोठी बहीण, सुप्रिया, सीमा , पूनम त्या तर मला मिलिंद दादाच म्हणतात, मला मामे बहिणी आहेत. मीनल मंजुषा माधुरी, शिल्पा आणि स्मिता, आणि शक्ती मग माझ्या मावस बहिणी आहेत. प्रीतम,सृष्टी, विद्या ,ज्योती, सोनल ,शितल, गुड्डी, माझ्या चुलत बहिणी आहेत वर्षा,वैशाली, स्वाती आणि वृषाली मला फक्त आते बहीण नाहीये कारण माझ्या आत्याला तीन मुलं च आहेत. आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी माझ्या बहिणींना मिस करतोय, त्यांना मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो, सुख समृद्धी यश आरोग्य त्यांना, आणि त्यांच्या कुटुंबीयांना भरभरून मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT