milind gawali, aai kuthe kay karte SAKAL
मनोरंजन

Milind Gawali: माझ्या दिसण्याचा मला न्यूनगंड, माझा रंग.. मिलिंद गवळींनी सांगितलं धक्कादायक वास्तव

अनिरुद्ध हि नकारात्मक भूमिका साकारुनही मिलिंद गवळी यांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय

Devendra Jadhav

Milind Gawali News: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत अरुंधतीचं आशुतोष सोबत लग्न झालंय. बायको अरुंधतीच्या लग्नाला अनिरुद्धने कडवा विरोध केला.

पण नाही नाही म्हणता अरुंधती बोहल्यावर चढलीच आणि तिने आशुतोष सोबत लग्न केलं. सध्या मालिकेचा ट्रॅक पाहता मिलिंद गवळी साकारत असलेली अनिरुद्धची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

(milind gawali from aai kuthe kay karte post on he is not comfortable with his own skin colour)

मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्यांसोबत अभिनय केलाय. पन्नाशी उलटून गेली तरीही मिलिंद गवळी आजही फिट आणि हँडसम आहेत.

पण एकवेळ अशी होती जेव्हा मिलिंद यांना त्यांच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड वाटत होता. मिलिंद गवळी यांनी स्विमिंगपूल मधला एक व्हिडिओ शेयर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

मिलिंद गवळी लिहितात.."होय एखाद्या अभिनेत्याकडे फक्त त्याचे शरीर असते, बाकी काही नसते, क्रिकेटरकडे बॅट असते, संगीतकाराकडे गिटार, तबला किंवा बासरीसारखे वाद्य असते.

अभिनेत्यांकडे त्याचे शरीर असते दुसरं काही नाही. त्यामुळे कोणतीही भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याला शरीराला सतत ट्यून करावे लागते.

मिलिंद गवळी पुढे लिहितात.. "आजकाल नवीन पिढीतील कलाकार आपल्या शरीराची खूप काळजी घेतात, जिममध्ये जातात, चालतात, जॉग करतात, खेळ खेळतात.

पण कलाकारांचा आणखी एक ग्रुप आहे जो कधीही स्वतःची काळजी घेत नाही, ते धूम्रपान करतात, ते रात्री उशिरा जागे असतात, जास्त खातात, कधीही व्यायाम करत नाहीत.

मिलिंद गवळी अभिनेत्यांच्या निष्काळजीपणाबद्दल भाष्य करून लिहितात कि, "मी अशा लोकांना भेटलो आहे, विशेषत: अशा अभिनेत्यांना जे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या शरीरावर आनंदी नव्हते, अनेकांना स्वतःबद्दल, त्यांच्या दिसण्याबद्दल किंवा त्यांच्या पोटाबद्दल किंवा शरीराच्या चरबीबद्दल काही ना काही तक्रारी आहेत.

पूर्वी मी देखील त्यांच्यापैकी एक होतो, मलाही माझ्या दिसण्याबद्दल न्यूनगंड होता. परंतु आता मी माझ्या दिसण्याबद्दल कम्फर्टेबल आहे"

अशाप्रकारे मिलिंद गवळी यांनी कलाकाराने स्वतःला कसं जपावं याविषयी पोस्ट लिहिली आहे. मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर त्यांच्या फॅन्सनी सुद्धा त्यांचे वैयक्तिक अनुभव शेयर केलेत.

आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध हि नकारात्मक भूमिका साकारुन सुद्धा मिलिंद गवळी यांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

Latest Marathi News Live Update : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कारवाईचा बडगा

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

Sushma Andhare : नगरसेवकांची पदे लिलावातच काढा; उमेदवारांना दिल्या धमक्या, अंधारे यांची भाजपवर टीका

Vote Counting Center Declare : पुण्यातील मतमोजणी केंद्रे जाहीर! तुमच्या भागातील मतमोजणी कोणत्या ठिकाणी होणार वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT