mira jagannath esakal
मनोरंजन

Mira Jagannath: 'माझ्याबद्दल घाणेरड्या अफवा...' मीराचा संताप

मराठी बिग बॉसमधून लाखो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मीरा जगन्नाथबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mira Jagganath: मराठी बिग बॉसमधून लाखो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मीरा जगन्नाथबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याविषयी तिनं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करुन आपलल्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्यांना अद्दल घडवा. असे आवाहन मुंबई पोलिसांना केले आहे. सोशल मीडियावर ती पोस्ट व्हायरल झाली आहे. बिग बॉसमध्ये आपल्या हटके स्टाईलमुळे मीरा ही चर्चेत आली होती.

सोशल मीडियावर मीरानं तिच्याविषयी घाणेरड्या अफवा पसरविणांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही करुन त्यांना मुंबई पोलिसांनी धडा शिकवावा. असे तिनं म्हटले आहे. मला आशा आहे की, मुंबई पोलिस जे कुणी त्या पोस्ट करत असतील त्यांना धडा शिकवतील. असा विश्वास मीरानं आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. मीरा विषयी सांगायचे झाल्यास ती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं आपल्या परफॉर्मन्सनं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

मीराचा बोल्ड अन् बिनधास्त अंदाज हा नेटकऱ्यांना भावला होता. अशावेळी मीरानं आपल्याला सोशल मीडियावरुन काही जण आक्षेपार्ह पोस्ट करुन त्रास देत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मीरानं मुंबई पोलिसांकडे त्यांच्याविषयी तक्रार केली आहे. मीरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माझ्याविषयी घाणेरड्या अफवा पसरत असल्याचं म्हटलं आहे. माझ्याविषयी खोटी आणि घाणेरडी माहिती इतरांना सांगण्यात येत असल्याचा आरोप मीरानं केला आहे. तसेच जे कुणी असे कृत्य करत आहे त्यांना मुंबई पोलीस अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. असेही म्हटले आहे.

Mira Jagganath

मीराची ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून तिच्या चाहत्यांनी झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी मीराला सपोर्ट केला आहे. ज्यांनी कुणी तिला वेगवेगळ्या पोस्ट करुन त्रास दिला आहे त्यांचा तिनं निषेध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gram Panchayat: ग्रामपंचायत ‘प्रशासक राज’ला तूर्त स्थगिती उच्च न्यायालय, राज्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा

मोहम्मद शमी, इशान किशनसह ५ मोठ्या खेळाडूंना BCCI ने वार्षिक करारातून वगळले! जाणून घ्या त्यामागचं कारण

Viral Video : 30000 प्रेक्षकांच्या गर्दीत हरवलेल्या लहानग्याची सोनू निगमने केली मदत ; सोशल मीडियावर होतंय कौतुक

लोक मला त्याचा चमचा म्हणतील पण... सलमान खानबद्दल असं वक्तव्य करणारा आहे तरी कोण?

'तो गर्लफ्रेंडला शिवीगाळ, मारहाण करायचा आणि...' सलमान खानच्या जवळच्या मित्राचे आरोप, म्हणाला...

SCROLL FOR NEXT