Mirzapur actor ali fazal get angry on sajid khan says get out him of big boss16 Google
मनोरंजन

Sajid Khan: मिर्झापूरचा गुड्डू भैय्याही भडकला, साजिद खानचा फोटो पोस्ट करत काय केलं ते पहा...

बिग बॉस 16 मध्ये जेव्हापासून मीटू आरोपी साजिद खान सामिल झालाय तेव्हापासून रोज कोणी ना कोणी त्याच्यावर आगपखड करताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Sajid Khan: 'बिग बॉस 16' जेव्हापासून सुरु झालं आहे तेव्हापासून एका गोष्टीला घेऊन जो वाद सुरु झालाय तो आजतागायत संपायचं नाव घेत नाही. आणि ते म्हणजे साजिद खानची बिग बॉसच्या घरात एन्ट्री. फराह खानचा भाऊ,फिल्ममेकर आणि मीटूच्या आरोपांमुळे चांगलाच वादात सापडलेला साजिद खानचा बिग बॉस 16 मधील सहभाग अनेकांना खटकला अन् त्याचा विरोध होऊ लागला.

राणी चटर्जी,शर्लिन चोप्रा पासून मंदाना करिमी सहीत अनेक स्टार्सनी साजिद खानच्या बिग बॉस १६ मधील सहभागावार विरोध दर्शवला आहे. आता मिर्झापूर अभिनेता अली फजलनं देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं या प्रकरणात साजिद खानचाच विरोध केला आहे.(Mirzapur actor ali fazal get angry on sajid khan says get out him of big boss16)

Richa chaddha सोबत अली फजल नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्यानं आता साजिद खानविरोधात सोशल मीडियावर आपला विरोध पोस्टच्या माध्यमातून दर्शवला आहे. त्याने साजिद खानचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,''बिग बॉसच्या घरातून लगेचच साजिद खानला बाहेर काढा''. त्या पोस्टमध्ये साजिद खानचा जळणारा फोटो पाहून लक्षात येतंय की अलीच्या रागाचा पारा किती चढला असेल.

Mirzapur actor ali fazal get angry on sajid khan says get out him of big boss16

मीटू मोहिमे अंतर्गत साजिद खानच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले होते. 2018 मध्ये जवळपास 10 अभिनेत्री, मॉडेल्स आणि पत्रकारांनी फिल्ममेकरच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या महिला आयोगानं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना साजिद खान संबंधित प्रकरणावर एक पत्र लिहिलं होतं. या पत्रातून साजिद खानला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्पलॉइजनं साजिद खानची बाजू घेत म्हटलं आहे की, ''साजिद खाननं १ वर्षाची शिक्षा भोगली आहे, कारण त्याच्यावर १ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मार्च,२०१९ मध्ये त्याच्यावरची बंदी हटवण्यात आली आहे''. पण एवढं स्पष्टीकरण देऊनही साजिद खानला होणारा विरोध काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT