Mirzapur Ali Fazal Pankaj Tripathi Web Series esakal
मनोरंजन

Mirzapur : मिर्झापूरच्या मेकर्सनं दिली आनंदाची बातमी, 'आता...'

राज डीके हे देखील त्यापैकीच एक नाव. शोर इन द सिटीपासून या दिग्दर्शकांनी आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mirzapur Ali Fazal Pankaj Tripathi Web Series : ओटीटीवर ज्या मालिकांनी आणि चित्रपटांनी सर्वाधिक प्रेक्षकवर्गाची पसंती मिळवली त्यात सेक्रेड गेम्स, फॅमिली मॅन आणि मिर्झापूर मालिकेचे नाव घ्यावे लागेल. मिर्झापूर मालिकेनं देखील प्रचंड यश मिळवले. त्या मालिकेनं आपली वेगळी ओळख निर्माण केली. पंकज त्रिपाठीच्या अभिनयाची कमाल आणि राज डीके यांच्या दिग्दर्शनानं वेगळाच ट्रेंड सेट केला होता.

वेब मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. दर दिवशी या ओटीटी विश्वावर वेगवेगळ्या विषयाचा कंटेट येतो त्याला चाहत्यांची पसंती मिळते. कोरोनापासून ओटीटीनं आपली हटके ओळख तयार केली आहे. अशातच बॉलीवूडमधील काही दिग्दर्शकांनी देखील ओटीटीवर वेगळे प्रयोग तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना यश आले. राज डीके हे देखील त्यापैकीच एक नाव. शोर इन द सिटीपासून या दिग्दर्शकांनी आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

मिर्झापूर मालिकेचा चाहतावर्ग वेगळा आहे. ओटीटी विश्वात आतापर्यत सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेल्या मालिकांमध्ये मिर्झापूरचा क्रमांक हा पहिल्या तीनमध्ये येतो. या मालिकेचे आतापर्यत दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. बऱ्याच दिवसांपासून या मालिकेचा तिसरा सीझन कधी येणार असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत मेकर्सनं आता आनंदाची बातमी दिली आहे.

पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, दिव्येंदू शर्मा, कुलभुषण खरबंदा आणि अली फजल यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिक होत्या. या मालिकेतील संवाद लोकप्रिय झाले होते. त्यावरील मीम्सही विशेष व्हायरल होताना दिसतात. प्राईम व्हिडिओवर ही मालिका प्रसिद्ध झाली होती. आता या मालिकेचा तिसरा सीझन लवकरच प्रतिक्षेत होणार आहे. असे मेकर्सच्या वतीनं सांगण्यात आले आहे.

मेकर्सनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे मिर्झापूरवर आता एक फिचर फिल्मची निर्मिती केली जाणार आहे. दुसरीकडे तिसऱ्या सीझनची घोषणाही करण्यात आली आहे. या वर्षांच्या शेवटच्या मिर्झापूरचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT