Miss Universe 2022 Finalist Sienna Weir Dies in a tragic horseriding accident Esakal
मनोरंजन

Sienna Weir Passes Away : घोडेस्वारी करताना अपघातात 23 वर्षीय मॉडेलचं निधन

Vaishali Patil

2022 मिस युनिव्हर्स फायनलिस्ट आणि ऑस्ट्रेलियन फॅशन मॉडेल असलेली सिएना वेअर हिचं वयाच्या 23 व्या वर्षी निधन झालं आहे. वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात घोडेस्वारी करतांना सीएनाचा अपघाता झाला होता त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु होते मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

(Miss Universe 2022 Finalist Sienna Weir Dies in a tragic horseriding accident)

तिच्या मॉडेलिंग एजन्सी स्कूप मॅनेजमेंटने देखील तिच्या मृत्यूची पुष्टी केली कारण तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

2 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियातील विंडसर पोलो मैदानात सिएना घोडेस्वारीचा आनंद घेत होती. मात्र अचानक ती घोड्यावरुन खाली पडली त्यावेळी तिला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर अनेक दिवसांपासून उपचारही सुरु होते. मात्र त्या दरम्यानच तिला मृत्यूनं घेरलं.

'मिस युनिव्हर्स 2022' या स्पर्धेत सिएनानं तिच्या सौदर्याचा जलवा दाखवला होता. ता या स्पर्धेत शेवटच्या भागात पोहचली होती. ब्यूटी क्वीनने सिडनी विद्यापीठातून इंग्रजी साहित्य आणि मानसशास्त्रात दुहेरी पदवी प्राप्त केली होती आणि तिने केवळ तीन वर्षांची असताना घोडेस्वारी सुरू केली होती.

तिच्या मृत्यूनंतर, तिच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये काम करणारा ऑस्ट्रेलियन छायाचित्रकार ख्रिस ड्वायर याने देखील मॉडेल सिएना वेअरला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहे. त्याने सिएनाचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले, “तु जगातील सर्वात दयाळू लोकांपैकी एक होतीस तू कमी कालावधीतच प्रसिद्धीचा झगमगाट पाहिलास आणि आता अंधार करुन गेलीस.'

सोशल मीडियावर तिच्या निधनाची बातमी पसरताच, तिचे चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी तिला श्रद्धांजली वाहण्यास सुरवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकलच्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! १८ डब्यांची लोकल लवकरच धावणार; चाचणी घेणार, पण कधी?

Stock Market Today : शेअर बाजार ‘लाल’ रंगात बंद; सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला, Reliance ला मोठा झटका; पण ‘हे’ शेअर्स तेजीत

Vijay Hazare Trophy: संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला, पण विष्णू विनोदनं ठोकले १४ सिक्स; ऋतुराज गायकवाडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Thane Metro: ठाणे मेट्रो कधी सुरू होणार? प्रताप सरनाईकांनी 'ती' वेळच सांगितली! तारखेबाबत मोठी अपडेट समोर

OTTवर अचानक ट्रेंड होतोय २ वर्ष जुना सिनेमा; IMDb रेटिंग फक्त ५. ८; पण पाहणाऱ्यांची झालीये गर्दी

SCROLL FOR NEXT