Miss Universe 2023 updates 
मनोरंजन

Miss Universe 2023: भारताची श्वेता शारदा पोहोचली उपांत्य फेरीत! मिस युनिव्हर्सचा ताज आणणार भारतात?

मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023च्या सेमीफायनलसाठी निवडलेल्या 20 स्पर्धकांमध्ये श्वेता शारदाचाही समावेश आहे.

Vaishali Patil

Miss Universe 2023 updates: फॅशन, स्टाईल आणि सौंदर्यात आवड असणारे लोक दरवर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेची वाट पाहत असतात. यंदा 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धला एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे सुरुवात झाली आहे. येथे मिस युनिव्हर्स स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

18 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेत अमेरिकेच्या 90 वेगवेगळ्या देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. मिस युनिव्हर्स 2023 चा कार्यक्रम भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता सुरू झाला आहे. तर यावेळी सौंदर्यवती श्वेता शारदा ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

यावेळी देखील मिस युनिव्हर्स बनण्यासाठी स्पर्धेकांना अनेक वेगवेगळ्या टप्प्यांतून जावे लागणार आहे. पर्सनल स्टेटमेंट, इंटरव्यू, इवनिंग गाउन्स आणि स्विमवेअर यांचा यात सामावेश असणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन Jeannie Mai आणि Maria Menounos आणि माजी मिस युनिव्हर्स Olivia Culpo यांनी केले आहे. यंदा सुमारे 84 स्पर्धक मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी आहेत ज्यात स्विमसूट फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीत सेमीफायनलसाठी 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे ज्यात भारताच्या श्वेता शारदाचाही समावेश आहे.

23 वर्षीय श्वेता शारदा ही यंदा मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. ती एक उत्तम मॉडेल आणि डान्सर आहे, चंदीगडची रहिवासी असलेली श्वेता डान्स दिवाने, डान्स प्लस आणि डान्स इंडिया डान्स यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे.

श्वेता शारदा मिस दिवा युनिव्हर्स 2023 ची विजेती देखील आहे. आता तिने मिस युनिव्हर्सचा ताज भारतात आणेल का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT