mithun chakraborty, Madalsa Sharma and actress rupali ganguly file image
मनोरंजन

सून शूटिंगमध्ये व्यस्त; 'मिथून दा'ने सेटवर केली सरप्राइज एन्ट्री

शूटिंगच्या सेटवर येऊन मिथून दा यांनी सर्वांनाच सरप्राइज दिले.

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी नुकतीच ‘अनुपमा’(anupamaa) या मासिकेच्या सेटवर हजेरी लावली. त्यांना या मालिकेच्या सेटवर पाहून सर्वाजण आश्चर्यचकित झाले. शूटिंग सेटवर येऊन मिथून दा यांनी सर्वांनाच सरप्राइज दिले. या मालिकेमधील अभिनेत्री मदालसा शर्मा (Madalsa Sharma) ही मिथून यांची सून आहे. 'अनुपमा' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मालिकेमधील रूपाली गांगुली(rupali ganguly), सुधांशु पांडे आणि मदालसा शर्मा यांच्या अभिनयाला प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.(mithun chakraborty visits anupamaa set meet daughter in law Madalsa Sharma and actress rupali ganguly)

मिथून चक्रवर्तीचे ‘अनुपमा' मालिकेच्या टिमसोबतचे फोटो या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रूपाली गांगुली यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रूपाली गांगुलीने या फोटोंना कॅप्शन दिले, 'आनंदी आठवणी आठवत आहेत, 4 वर्षांची असताना मी पहिल्यावेळी कॅमेरासमोर अभिनय केला होता. माझी मुख्य भूमिका असणारा पहिला चित्रपट मी मिथून यांच्यासोबत केला. हे असे व्यक्ती आहेत, ज्यांनी मला नेहमी स्वत:ला एक कलाकार म्हणून गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिला. जेव्हा त्यांनी सांगितले की मला तुझा अभिमान आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाने आश्रु आले.असे वाटले की माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले.'

मिथून चक्रवर्ती आणि अभिनेत्री रूपाली गांगुली यांनी एकत्र ‘अंगारा’ चित्रपटांमध्ये काम केलंय. हा चित्रपट 1996 साली रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रूपाली गांगुलीचे वडील अनिल गांगुली यांनी केले होते. अनुपमा मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर मिथून चक्रवर्ती यांच्या सरप्राइज व्हिजीटचे काही फोटो शेअर केले आहेत. 'मिथून, या सरप्राइज व्हिजीटसाठी खूप खूप धन्यवाद!', असं त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane New: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT