Amey Khopkar 
मनोरंजन

'यापुढे सेटवर येऊन त्रास दिला तर..'; राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक

'होय मी धमकी देतोय..'

स्वाती वेमूल

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी राजू यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्रास दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी या व्हिडीओमध्ये केला. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला. 'यापुढे कोणत्याही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकीच आहे', असं ते म्हणाले. (mns amey khopkar warning to labour unions of film industry after art director raju sapte suicide)

राजू सापते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओत लेबर युनियनचे पदाधिकारी राकेश मौर्या आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला. यावरूनच अमेय खोपकर यांनी हा इशारा दिला. 'उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन शूटिंग बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा', असं अमेय खोपकर म्हणाले.

आत्महत्या करण्यापूर्वी काय म्हणाले राजू सापते?

व्हिडिओमध्ये राजू यांनी सांगितले, 'मी आता कुठल्याही प्रकारची नशा केली नाही. मी पूर्ण विचाराने हा निर्णय घेत आहे. मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. लेबर युनियनचे राकेश मौर्या हे मला खूप त्रास देत आहेत. माझं कोणत्याही प्रकारचे पेमेंट त्यांच्याकडे थकीत नाही. सगळे पेमेंट मी दिलेले आहेत. माझे कोणतेही पैसे बाकी नाहीत. पण राकेश मौर्या यांनी युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून हे वदवून घेत आहेत, की राजू सापतेंनी पैसे दिले नाही. नरेश मेस्सी यांनी मी कोणतेही पेमेंट आत्तापर्यंत बाकी ठेवलेले नाही असे राकेश यांना सांगितले. तरी देखील ते मला त्रास देत आहते. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. त्यातील एक प्रोजेक्ट मला त्यांच्यामुळे सोडावे लागले. कारण ते मला काम करू देत नाहीत. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT