मनोरंजन

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर कुटुंबीयांसह क्वारंटाईन

संतोष भिंगार्डे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आपल्या कुटुंबियांसह क्वारंटाईनमध्ये आहे. त्यांच्या काकांना अर्थात रवींद्र खोपकरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अमेय आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय क्वारंटाईन झाले आहे. त्यांची कोरोना चाचणी झाली आहे. मात्र, त्याचे रिपोर्ट अद्याप प्रतिक्षेत आहे.

रवींद्र खोपकर यांना थकवा जाणवत होता आणि त्यानंतर त्यांना ताप आला. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे लगेच त्यांना कु्र्ला येथील सोमय्या रुग्णालयात तीन दिवसांपू्र्वी दाखल करण्यात आले. त्यानंतर अमेय खोपकर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले. कारण संपूर्ण खोपकर कुटुंबीय एकत्रित राहते. 

आता खोपकर कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल लवकरच येईल. याबाबत अमेय खोपकर म्हणाले, की माझ्या काकांवर उपचार सुरू आहेत. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. आम्ही सर्वजण घरीच क्वारंटाईनमध्ये आहोत.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT