Monkey Man latest news esakal
मनोरंजन

Monkey Man : देव पटेलचा 'मंकी मॅन' पाहून प्रेक्षकांचे 'स्टॅडिंग ओव्हेशन', अभिनेत्याला रडू आवरेना!

प्रसिद्ध अभिनेता देव पटेलचा मंकी मॅन (Monkey Man Movie) हा सध्या चर्चेचा विषय आहे. नुकताच त्याचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला आहे.

युगंधर ताजणे

Dev Patel got emotional after Monkey Man :

प्रसिद्ध दिग्दर्शक डॅनी बॉयल यांचा स्लमडॉग मिलेनियर तुम्ही जर पाहिला असेल तर देव पटेल कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. स्लम डॉगनं ऑस्कर पुरस्कारावर आपल्या नावाची मोहोर उमटवली होती. त्यातील देवचा आता मंकी मॅन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. मंकी मॅनचा वर्ल्ड प्रीमिअर नुकताच पार पडला.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयानं देव पटेलनं त्याच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्लमडॉग शिवाय त्यानं रामानुजन यांच्या आयुष्यावरील चित्रपटात केलेलं काम असो किंवा लायन असो त्यातील देवच्या अभिनयाचं चाहत्यांनी कौतुक केलं होतं. आता त्याच्या मंकी मॅनलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. निमित्त होतं मंकी मॅनच्या वर्ल्ड प्रीमियरचे.

सोशल मीडियावर देव पटेलच्या मंकी मॅनच्या प्रीमियरचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यात चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला दिलेलं स्टॅडिंग ओव्हेशन हे चर्चेत आहे. प्रेक्षकांचा एवढा तुफान प्रतिसाद पाहून देवला स्टेजवरच रडू कोसळल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देवच्या या चित्रपटाची चर्चा आहे. यापूर्वी त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

मंकी मॅनच्या माध्यमातून देव हा दिग्दर्शनातून डेब्यू करतो आहे. त्यामुळे त्याची खास चर्चा आहे. प्रेक्षकांना आता चित्रपटाचे वेध लागले असून त्यातून त्यांनी आगळी वेगळी ट्रीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. देवनेच या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे. एसएक्सडब्ल्यूमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. तिथं निमंत्रित प्रेक्षकांनी जेव्हा त्याचा मंकी मॅन पाहिला तेव्हा ते कमालीचे प्रभावित झाले आणि त्यांनी उभं राहून देवच्या या चित्रपटाला दाद दिल्याचे दिसून आले.

देवला रडू आवरेना...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये मंकी मॅन चित्रपट संपल्यानंतर येणारी श्रेय नामावली पडद्यावर दिसते. त्याचवेळी दुसरीकडे उभं राहून प्रेक्षकांनी देवला दिलेला प्रतिसादही लक्ष वेधून घेतो. यात देवनं भावूक होत प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाचा स्विकार केला आहे. या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास तो १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

काय आहे मंकी मॅनची स्टोरी?

असं म्हटलं जातं की मंकी मॅनची स्टोरी ही भगवान हनुमानच्या एका कथेपासून प्रेरित आहे. त्यात देवची भूमिका त्या कथेला साजेशी अशी आहे. समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश करत एक वेगळा आदर्श समोर ठेवण्याचे काम त्यानं या चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे. लहानपणापासून मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागणाऱ्या देवला भविष्यातही किती त्रास सहन करावा लागतो त्यासाठी त्याच्या मदतीला कोण धावून येतं, हा प्रवास मंकी मॅनमधून दाखवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council decision : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोदी सरकारकडून 'GOOD NEWS' ; दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

No GST on Insurance: आरोग्य व जीवन विम्यावर शून्य GST; तुमच्या पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार?

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

Uday Samant: लंडनमध्ये ‘मराठी भाषा केंद्र’! महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेणार

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT