Suraj Nambiar and Mouni Roy celebrate Holi at home. Google
मनोरंजन

नवऱ्याच्या पायाला गुलाल लावत मौनीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली धुळवड

मौनी रॉयनं आपला मित्र सूरज नांबियार सोबत या वर्षाच्या सुरुवातीला गोव्यात लग्नगाठ बांधली होती.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय(Mouni Roy) हिनं नवरा सूरज नांबियारसोबतचे होळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केलेयत. ते दोघेही त्यांच्या घरात धुळवड साजरी करताना दिसत आहेत. दोघांनीही पांढरे शुभ्र कपडे घातले आहेत. ज्यात मौनीनं पांढऱ्या रंगाचा चुडीदार तर सूरजनं कुर्ता-पजामा घातला आहे. फोटोत त्यांचा लाडका कुत्राही धुळवड साजरी करताना दिसत आहे.

एका फोटोत मौनी आणि सूरजचे हात रंगानं माखलेले दिसत आहेत. तर एका फोटोत मौनी सूरजच्या गालाला लाल गुलाल लावताना दिसत आहे. तर एका फोटोत ती सूरजच्या पायाला गुलाल लावताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत मौनीनं चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. मौनीच्या या पोस्टवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींपासून तिच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी तिला लग्नाननंतरच्या पहिल्या होळी सेलिब्रेशनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मौनी नेहमीच जे सेलिब्रेशन करते त्याला परंपरेचा साज असतो. मग तिच्या लग्नातील सोहळ्यांपासून आताच्या होळी सेलिब्रेशन पर्यंत साऱ्याच गोष्टीत तिनं ती परंपरा जपलेली दिसत आहे.

तिचा नवरा सूरज नांबियारनं देखील होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत लिहिलंय,''माझी खास मैत्रिण आणि माझं प्रेम. जगातला सगळ्यात लकी माणूस आहे मी''. असं कॅप्शन त्यानं दिलेलं आहे. मौनीचे होळी सेलिब्रेशनचे हे फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तर सारेच तिनं जपलेल्या परंपरेचं कौतूकही करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 मार्च 2026

Pune News: औषधोपचाराने ‘एमडीआर’ क्षयरोगावर मात; मृत्युदर घट, बरे होण्याचे प्रमाण वाढले

इनर इंजिनिअरिंग : आपल्यातील सर्वोच्च शक्ती

SCROLL FOR NEXT