MP Nusrat Jahan shares navratri celebration photos with husband 
मनोरंजन

नुसरतचे नवरात्रीतील हे फोटो बघितले का?

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ कायम काही ना काही कारणाने चर्चेत असते. तिने उद्योगपती निखील जैन यांच्याशी लग्न केल्यापासूनच तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले आहे. पण ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करत पतीच्या सर्व परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. कालही नुसरतने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती पतीसोबत दिसतीये. त्यामुळे पुन्हा एकदा तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

सध्या सगळीकडेच नवरात्रीचा उत्साह पसरलाय. नवरात्रीसाठी पश्चिम बंगाल प्रसिद्ध आहे. तेथील दूर्गापूजा, देवीची मिरवणूक, प्रसाद या गोष्टी प्रसिद्ध आहेत. मूळची कोलकात्याची असलेली नुसरतही नवरात्र उत्साहाने साजरी करतीय. काल नवरात्रीतील महत्वाचा दिवस म्हणजेच अष्टमी होती. अष्टमीला धार्मिक महत्त्व आहे. नुसरत ही पतीसोबत पोहोचलीय एका दूर्गापूजेत! याच दूर्गापूजेचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. लाल रंगाची काठांची सुंदर अशी साडी तिने परिधान केली आहे. दागिने, मोठं कुंकू यामुळे ती आणखीनच उठून दिसत आहे. तिच्या पतीने म्हणजेच निखीलनेही लाल रंगाचा कूर्ता परिधान केलाय. 

या दूर्गापूजेत हे पती-पत्नी कोलकात्यातील एक वाद्य वाजवताना दिसत आहेत. तसेच त्याच्या ठेक्यावर नृत्य करतानाही दिसत आहे. नुसरतच्या या सर्व फोटो व व्हि़डिओमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. 2019 मधील लोकसभा निवडणूकीत ती तृणमूल काँग्रेस पक्षाकडून उभी होती. नुसरत खासदार म्हणून निवडून आली. त्यानंतर लोकसभेतील पेहरावामुळेही ती चर्चेत आली होती. त्यानंतर मालदिवमधील तिच्या हनीमूनच्या फोटोंमुळेही नुसरत ट्रोल झाली होती.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT