'Mr Natwarlal', 'Yaarana' director Rakesh Kumar passes away sakal
मनोरंजन

Rakesh Kumar Died: बॉलिवूड दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी..

राकेश कुमार यांनी अनेक अजरामर चित्रपट बॉलीवुडला दिले आहेत.

नीलेश अडसूळ

Rakesh Kumar passes away: मनोरंजन विश्वातून गेल्या काही दिवसात सातत्याने वाईट बातम्या येत आहेत. अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे निधन होऊन काही दिवस उलटले नाही तोवरच बॉलीवुडला पुन्हा एक धक्का बसला आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते अशी नाहु ख्याती असलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार राकेश कुमार (Rakesh Kumar) यांचे निधन झाले आहे.

('Mr Natwarlal', 'Yaarana' director Rakesh Kumar passes away)

राकेश कुमार यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडध्ये शोककळा पसरली आहे. राकेश कुमार गेल्या काही दिवसांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. राकेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील अनेक सिनेमांचं दिग्दर्शन राकेश यांनी केले होते. तर 'खून पसीना', 'दो और दो पांच' आणि 'याराना' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा राकेश कुमार यांनी सांभाळली आहे. तसेच 'मिस्टर नटवरलाल' हा त्यांचा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन, रेखा, कादर खान आणि अमजद खान मुख्य भूमिकेत होते.राकेश कुमार यांना अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलीवुडमधील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Truck Accident: दर्शनाला निघाले, पण घरी परतलेच नाहीत! शीतला माता मंदिराच्या वाटेवर काळाचा घाला; १२ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, २९ जखमी!

Children's Internet Rights: इंटरनेट हा मुलांचा मूलभूत अधिकार;सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Maharashtra Rain Alert : दिलासादायक ! राज्यात पाऊस परतणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात धो धो कोसळणार, १० जिल्ह्यांना येलो अलर्ट

Navratri Upvas Recipe: उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग अन् चटपटीत 'उपवासाचा समोसा'!

Mangalwedha Crime : जवळ झोपून न देणाऱ्या पत्नीचा रॉकेलने पेटवून खून; पतीस शिक्षा

SCROLL FOR NEXT