Apoorva Rai Instagram
मनोरंजन

Mrs Universe 2023: खूप कमी वयात लग्न..4 वर्षाच्या मुलाची आई..स्वप्न पहा म्हणणारी अपूर्वा राय आहे तरी कोण?

बंगळुरात राहणारी अपूर्वा राय मिसेस युनिव्हर्स २०२३ मध्ये सहभाग घेण्यासाठी बुल्गैरियाला रवाना झाली आहे.

प्रणाली मोरे

Mrs Universe 2023: कोण आहे अपूर्वा राय? याआधी कधी हे नाव ऐकलंय? कदाचित नाहीच. पण आता या नावाभोवती चर्चेत वर्तुळ आहे तेव्हा नक्की तिच्याविषयी जाणून घेण्यास इच्छुक असाल आपण.

तर अपूर्वा खूप मोठं यश संपादन करण्याच्या इच्छेने बुल्गैरियाला रवाना झाली आहे. आता आपणही हा विचार करत असाल की असं काय खास आहे अपूर्वा रायमध्ये की आम्ही तिच्याविषयी इतकी प्रस्तावना करत आहोत.(Mrs Universe 2023 Contestant represent India Apoorva Rai Journey,Life story)

तर अपू्र्वा राय दुसरी-तिसरी कोणी नसून तिनं मिसेस साऊथ पॅसिफिक एशिया युनिव्हर्स २०२२ हा पुरस्कार पटकावला आहे. आजच्या घडीला ती मिसेस युनिव्हर्स २०२३ मध्ये सहभाग घेण्यासाठी बुल्गैरियाला रवाना झाली आहे.

दोन दिवस आधी अपूर्वा रायला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. यादरम्यान तिनं मीडियाशी बोलताना सांगितलं की ती भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मिसेस युनिव्हर्स २०२३ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात आहे. हा प्लॅटफॉर्म तिच्यासाठी खूप मोठा आहे.

अपूर्वा रायनं जेव्हा मिसेस साऊथ पॅसिफिक एशिया युनिव्हर्स २०२२ हा पुरस्कार जिंकला होता तेव्हा तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की खूप कमी वयात तिचं लग्न झालं. आज ती एका ३ वर्षाच्या मुलाची आई आहे. पण तरिदेखील आपण स्वप्न पहायचं सोडलं नाही.

बंगळुरूमध्ये राहणारी अपूर्वा राय एक बिझनेस वुमन आहे. तिचं स्वतःचं कॉस्मेटोलॉजिस्ट क्लीनिक आहे,जिथे स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. तिच्या पतीचे नाव पवन शेट्टी आहे. सुरुवातीपासूनच अपूर्वाला देशासाठी काहीतरी करायची इच्छा होती.

त्यामुळे लग्नाआधी जरी तिला देशासाठी काही करता आलं नसेल तरी लग्नानंतर तिनं मिसेस युनिव्हर्ससारखा एखादा पुरस्कार आपल्या नावावर करायचं स्वप्न उराशी बाळगलं.

अर्थात,मॉडेलिंगच्या दुनियेत अपूर्वा राय लग्नाआधीच येऊ पाहत होती,पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहून ठेवलं होतं. कदाचित जे होतं ते अनेकदा चांगल्यासाठी होतं असं अपूर्वा मानते.

अपूर्वा सोबतही असंच काहीसं झालं. अपूर्वानं २०१६ मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये सहभाग घेतला होता. पण तो पुरस्कार ती जिंकू शकली नाही. त्यानंतर परिस्थितीच अशी बनली की मॉडेलिंगच्या दुनियेतला प्रवास तिला काही काळ तिथेच थांबवावा लागला.

अपूर्वाचं लग्न झालं. आणि त्यानंतर ती मिसेस साऊथ पॅसिफिक एशिया युनिव्हर्स २०२२ बनली. अपूर्वा रायचं एकच म्हणणं होतं की कधी स्वप्न पाहणं सोडू नका. आणि ती स्वतः देखील याचा ध्यास बाळगून राहिली.

आज अपूर्वा फिटनेस फ्रिक होण्यासोबतच आयुष्यात खूप ग्लॅमरस लाइफस्टाईलही जगते. आई बनलेल्या आणि बनू इच्छिणाऱ्या सगळ्याच महिलांसाठी अपूर्वा खरंच प्रेरणा आहे. अपूर्वा आजही स्कीन ट्रीटमेंटचं क्लीनिक चालवते. पण तिचं सगळ्यात जास्त फोकस आता सौंदर्य स्पर्धांवर तिनं केंद्रित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT