Mukesh Khanna again react on shahrukh khan And deepika padukone pathaan movie song besharam rang Google
मनोरंजन

Mukesh Khanna:'भगवी बिकिनी घालून अभिनेत्रीला नाचवता अन् मग..',बेशरम रंग गाण्यावरनं खवळले मुकेश खन्ना

मुकेश खन्ना यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओत शाहरुखच्या 'पठाण' सिनेमावर निशाणा साधत निर्मात्यांवर अनेक आरोप देखील केले आहेत.

प्रणाली मोरे

Mukesh Khanna On Pathaan: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाबाबत नको नको ते बोललं गेलं आहे. चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर अनेक राजकारणी आणि हिंदू संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पठाणच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल सुचवल्याचे ऐकायला मिळत आहे.

तर इकडे मुकेश खन्ना यांनी 'पठाण' च्या बेशरम रंग या गाण्यावर पुन्हा आपला आक्षेप नोंदवला आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा देखील दर्शवला आहे.(Mukesh Khanna again react on shahrukh khan And deepika padukone pathaan movie song besharam rang)

पठाण चित्रपट रिलीजची तारीख जवळ येत आहे तरी वाद काही संपायचे नाव घेत नाही उलट रोज नवीन वाद निर्माण होत आहेत.

मुकेश खन्ना यांनी एक नवीन व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देवाची वारंवार केलेली खिल्ली उडवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यात त्यांनी पीके, काली, लक्ष्मी, आदिपुरुष या चित्रपटांची नावांचा उल्लेख केला आहे. यानंतर शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने तर अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

मुकेश खन्ना यांनी निर्मात्यांना सवाल केला आहे की, ''हे काय आहे? हा वाद निर्माण करण्याचा मार्ग आहे का? या लोकांना वाटते की आधी वाद निर्माण करा, मग लोक त्या वादाला आणखी पेटवतील, आणि मग तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळेल, लोक चित्रपट पाहायला जातील. हा या निर्मात्यांचा हेतू मला माहीत आहे. सर्वांनी हिंदू धर्माला सॉफ्ट टार्गेट बनवले आहे. 'पठाण'च्या बेशरम रंग गाण्यांमुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे, त्याला माझा पाठिंबा आहे. या गाण्यावर बहिष्कार टाकलाच पाहिजे''.

इतकेच नव्हेतर मुकेश खन्ना यांनी सेन्सॉर बोर्डाला अधिक जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कोणताही निर्माता हिंदू धर्माशी खेळू शकणार नाही. ते म्हणतात- ''सेन्सॉर बोर्डावर असलेल्या अधिकाऱ्यांना हिंदू धर्माचे ज्ञान नसेल तर त्यांना तेथून पहिले हटवायला हवे. दीपिकाच्या बिकिनीच्या केसरी रंगात बदल झालाच पाहिजे, म्हणजे कोणताही निर्माता पुढे जाऊन असा उद्धटपणा करणार नाही. त्यांचे नुकसान होईल तेव्हाच या लोकांना समजेल''.

मुकेश खन्ना यांनी इंस्टा वर लिहिले - ''तुम्ही भगव्या रंगाची बिकिनी घालून नायिकेला डान्स करायला लावता. इतकेच नाही तर तुम्ही झूम करून लोकांना दाखवता “देखो देखो ये बिकिनी जोगिया रंग की” इतकी अभद्रता आणि अश्लीलता. शिवाय गाण्याचे बोल म्हणत बेशरम रंग..हा शुद्ध अपमान केला आहे हिंदू धर्माचा अन् पवित्र भगव्या रंगाचा. असा धाडसीपणा यांनी केल्यानंतर हा रंग पवित्र मानणारे हिंदू यांच्या विरोधात उभे राहणार नाहीत अशी आशा अजूनही आहे का???? नक्कीच उभे राहतील आणि उभे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT