Mukesh Khanna Controversial Comment on women lands him in trouble  Google
मनोरंजन

'शक्तिमान' अडचणीत, महिलांविषयी आक्षेपार्ह विधान भोवणार, दाखल होणार FIR

मुकेश खन्ना नेहमीच आपल्या You Tube चॅनेलच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य करतात आणि चर्चेत येतात.

प्रणाली मोरे

Mukesh Khanna: शक्तिमान फेम मुकेश खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरवेळेप्रमाणे यावेळी देखील खळबळजनक विधानामुळेच बरं का. त्याचं झालं असं की, मुकेश खन्ना यांनी आपल्या युट्युब वाहिनीवर महिलांविषयी आणि मुलींविषी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, ज्यानंतर आता अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. लोक त्यांना ट्रोल करत आहेत. तसंच आता बातमी आहे की मुकेश खन्ना यांच्या विरोधात पोलिस तक्रार करण्याची देखील तयारी सुरू करण्यात आली आहे.(Mukesh Khanna Controversial Comment on women lands him in trouble)

डीसीडबल्यूच्या चेअरपर्सन स्वाती मालीवान यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे एक नोटिस जारी केलं आहे, ज्यामध्ये मुकेश खन्ना यांच्या विरोधात FIR दाखल करण्याविषयी लिहिलं गेलं आहे. शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केलं आहे, त्याच प्रकरणात मुकेश खन्ना यांच्यावर तक्रार दाखल केली जाणार आहे. सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांनी केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत मुकेश खन्ना बोलताना दिसत आहेत की,''कोणतीही मुलगी जर कोणा मुलाला विचारते की,मला तुझ्याशी संभोग करायचा आहे,तर ती मुलगी ,मुलगी नाही. ती शरीरविक्रीचा धंदा करते असं समजावं. कारण कोणतीही सभ्य मुलगी असं कधीही मुलाला विचारणार नाही. जर एखादी मुलगी असं विचारते तर ती सभ्य समाजाची नाही असं समजावं. तो तिचा धंदा आहे म्हणून ती तंस विचारते. तुम्ही त्यात सहभागी होऊ नका. म्हणून सांगतो अशा असभ्य मुलींपासून स्वतःला वाचवा''.

मुकेश खन्ना यांचे हे वक्तव्य लोकांना मात्र चांगलेच खटकले आहे. मुकेश खन्ना यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला न झाला तोच लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. मुकेश खन्ना यांच्या महिलांविषयी केलेल्या वक्तव्यावर लोक ताशेरे ओढताना दिसत आहेत. लोक मुकेश खन्ना यांना प्रश्न विचारत आहेत की,'जर मुलं अशी मागणी करतात तेव्हा तुम्ही त्यांना काय म्हणाल?' एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'शक्तिमान यांचे डोके म्हातारपणात फिरले आहे,तेव्हा ते काहीही बरळत आहेत'.

तुमच्या माहितीसाठी इथं सांगतो की,मुकेश खन्ना यांचे युट्युब चॅनल आहे. ज्याचं नाव भीष्म इंटरनॅशनल आहे. त्यांच्या चॅनेलचे १.१५ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. मुकेश खन्ना नेहमीच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य करतात आणि चर्चेत येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT